नवी दिल्ली : देशात लवकरत बुलेट ट्रेन धावणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशात इंफ्रास्ट्रकचरला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार मोठी गुंतवणूक करणार असल्याचं म्हटलं आहे. याच्या मार्फत मॉर्डन रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस स्टेशन, लॉजिस्टिक सेंटर्स बनवले जाणार आहेत. इंफ्रास्ट्रक्चर कंपन्यांना स्टार्टअपमध्ये युवा पिढीला जोडण्यासाठी विनंती केली जाईल. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे, चेन्नई-बंगळुरु एक्सप्रेस-वे लवकरच पूर्ण केला जाणार आहे.
6000 किमीचे महामार्ग मॉनिटाईज केले जातील. देशात 2024 पर्यंत 100 नवे विमानतळ बनवण्यात येणार असल्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात केली जाणार आहे. 24000 किमी.पर्यंतच्या ट्रेन इलेक्ट्रॉनिक केल्या जाणार आहेत. तेजस ट्रेनची संख्या वाढवली जाणार आहे. पर्यटन ठिकाणांपर्यंत ही रेल्वे नेली जाईल. मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेनच्या कामात तेजी आली आहे. जल विकास मार्गांना महत्त्व दिलं जात आहे. हा मार्ग आसामपर्यंत बनवण्याची योजना आहे. ट्रांसपोर्टमध्ये 1.70 लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ५ वर्षात १०० लाख कोटींच्या गुंतवणुकीचं लक्ष्य सरकारने ठेवलं आहे.