Budget 2020: प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, आरोग्य योजनेसाठी ७० हजार कोटींची मोठी घोषणा

आरोग्य विभागासाठी मोठी अर्थमंत्र्यांची घोषणा

Updated: Feb 1, 2020, 12:04 PM IST
Budget 2020: प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, आरोग्य योजनेसाठी ७० हजार कोटींची मोठी घोषणा title=

नवी दिल्ली : नागरिकांचं आरोग्य सुधारावं यासाठी अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. आरोग्य योजनांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ७० हजार कोटींची घोषणा केली आहे. स्वस्थ भारताला पुढे नेण्यासाठी सरकार मोठी तयारी करत आहे. आयुष्मान भारत योजनेतील रुग्णालयांना वाढवलं जाणार आहे. ज्यामुळे टी2 आणि टी3 शहरांमध्ये देखील मदत पोहोचवली जाईल. यासाठी पीपीपी मॉडेल आणलं जाणार आहे. ज्यामध्य़े २ टप्प्यामध्ये रुग्णालय जोडलं जाणार आहे. केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या इंद्रधनुष मिशनचा देखील विस्तार केला जाणार आहे. 

मेडिकल डिवाईसवर जो कर लागतो. त्याचा वापर मेडिकल सुविधांसाठी केला जाणार आहे. टीबीच्या विरोधात देशात अभियान सुरु केलं जाणार आहे. टीबी हारेगा, देश जितेगा. सरकारकडून २०२५ पर्यंत टीबी मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रधानमंत्री जन औषधी योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या सेंटर्सची संख्या वाढवली जाणार आहे. आरोग्य योजनांसाठी ७० हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्हात मेडिकल कॉलेज

आता ऑनलाईन डिग्री लेवल प्रोग्राम चालवले जाणार आहेत. यासाठी सरकार लवकरच नवी शिक्षण नीती आणणार आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये मेडिकल कॉलेज बनवण्याची योजना आणली जाणार आहे. लोकल बॉडीमध्ये काम करण्यासाठी युवा इंजीनियर्सला इंटर्नशिप सुविधा दिला जाणार आहे. 

उच्च शिक्षण आणखी चांगलं करण्यासाठी सरकार काम करत आहे. जगभरातील विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण्यासाठी सुविधा दिली जाईल. भारतातील विद्यार्थ्यांना आशिया, आफ्रिकेमधील देशांमध्ये अभ्यासासाठी पाठवलं जाईल. राष्ट्रीय पोलीस विश्वविद्यालय, राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विश्वविद्यालय बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. डॉक्टरांसाठी एक ब्रिज प्रोग्राम सुरु केला जाणार आहे. ज्यामुळे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना प्रोफेशनल गोष्टी सांगता येतील.