मुंबई : Bulandshahr violence देशाच्या राजधानीपासून उत्तर प्रदेशात अवघ्या १३२ किमी अंतरावर असणाऱ्या बुलंदशहर येथे अतिशय गंभीर स्वरूपाच्या हिंसाराची घटना घडली आहे. जवळपास ३०० लोकांच्या जमावाने पोलीस यंत्रणेवर हल्ला केल्यामुळे या घटनेत उत्तर प्रदेशचे पोलीस उपनिरीक्षक सुबोघ कुमार सिंग आणि २० वर्षीय सुमीत यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
जवळपास ३०० ते ५०० च्या संख्येत आलेल्या जमावाकडून आमच्यावर दगडफेक करण्यात आली. असं सांगत आपणही यामध्ये जखमी झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुमार यांनी दिली.
गोहत्येप्ररकरणी ही हिंसा भडकली असून, सोमवारपासूनच बुलंदशहर परिसरात तणावाचं वातावरण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही गावकऱ्यांना सदर परिसरातील जंगलामध्ये गोहत्येचे अवशेष सापडले. ज्यानंतर सर्व गावकरी आणि काही हिंदू संघटनांनी एकत्र येत हे अवशेष एका ट्रॅक्टर ट्रॉलीत भरत सबंधित भागातील पोलीस चौकीत नेत पोलिसांकडे या प्रकरणीच्या कारवाईची मागणी केली.
दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली. हे प्रकरण इतकं चिघळलं की तेथेच त्यांनी पोलीस यंत्रणांविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात करत, बुलंदशहर- गढ महामार्ग रोखून धरला.
सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना याविषयीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याचविषयी अधिक माहिती देत पोलीस अधिकारी सुरेश कुमार म्हणाले, 'या घटनेविषयी माहिती मिळताच पोलीस तडक घटनास्थळी रवाना झाले. तेथे पोहोचल्यावर असणारे अवशेश पाहिल्यानंतर ते शववविच्छेदनासाठी पाठवणार असल्याची माहिती त्यांनी घटनास्थळी उपस्थित गावकऱ्यांना दिली. पण, परिस्थिती बिघडचट चाससी होती. स्थानिकांकडून पोलिसांनी जबाब नोंदवला खरा. पण, प्रत्येकाकडून वेगळीच माहिती मिळत होती.'
स्थानिक नेमकं काय सांगण्याचा प्रत्न करत आहेत, हे समजून घेण्याचा पोलिसांनीप्रयत्न केला पण, त्यात ते अपयशी ठरल्याचंही ते म्हणाले.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यास सुरुवात झाल्यानंतर आंदोलक गावकऱ्यांनी आणि संतप्त जमावाने पोलिसांवर एकाएकी दगडफेक करण्यास सुरुवातत करत शयानातील पोलीस चौकीला निशाणा केलं.
पोलीस चौकीला निशाणा करत त्यांनी पोलिसांच्या जवळपास १५ गाड्यांचं नुकसान करत त्या पेटवून दिल्या. ज्यानंतर नाइलाजास्तव पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्च आणि हवेत गोळीबार करावा लागला. या हिंसाचारात, पोलीस उपनिरीक्षक सुबोध कुमार सिंग यांना आपला जीव गमवावा लागला. त्यासोबतच त्यांवच्यावर वारही करण्याच आले होते, अशी माहिती आनंद कुमार यांनी शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत दिली.
सुबोध कुमार सिंग यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. सिंग यांच्या सहाय्यक अधिकाऱ्याची प्रकृतीही गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
एकंदरच ही सर्व परिस्थिती पाहता सध्याच्या घडीला बुलंदशहर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. दंगलसदृश्य परिस्थिती उदभवल्यास त्याच्याशी दोन हात करण्यासाठीची तयारीही सुरक्षा यंत्रणांकडून ठेवण्यात आली आहे.
Chief Minister Yogi Adityanath declares a compensation of Rs 40 lakh for wife, Rs 10 lakh for parents & a government job for a kin of Police Inspector Subodh Kumar who died in violence in #Bulandshahr. (File pic) pic.twitter.com/DF3QsAzwAW
— ANI UP (@ANINewsUP) December 3, 2018
दरम्यान, राज्यात होणारा हिंसाचाराच्या घटनांचं वाढतं प्रमाण पाहता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून जनता बऱ्याच प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा करत आहे. पण, सद्यपरिस्थिती पाहता त्यांनी या साऱ्याकडे अत्यंत सावधगिरीने पाहत सुबोध कुमार सिंग यांच्या पत्नीला ४० लाख रुपये, त्यांच्या आई-वडिलांना १० लाख रुपये आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीचं आश्वासन दिलं आहे.