भारतीय जवानांना लवकरच मिळणार 'Mr. India' सारखी अदृष्य होण्याची शक्ती

भारत अमेरिकेच्या पुढे

शैलेश मुसळे | Updated: Dec 3, 2018, 08:44 PM IST
भारतीय जवानांना लवकरच मिळणार 'Mr. India' सारखी अदृष्य होण्याची शक्ती title=

नवी दिल्ली : आयआयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनी 'मिस्‍टर इंडिया' सिनेमातील अदृश्य होणाऱ्या फॉर्मूला शोधून काढला आहे. त्यांनी मेटा-मेटेरियलचा शोध लावल्याचा दावा केला आहे. ही गोष्ट घातल्याने किंवा अंगावर ओढून घेतल्याने भारतीय लष्कराचे जवान, त्यांचे टँक, लढाऊ विमान, कॅमेरे यामुळे दिसणार नाही. यामुळे शत्रूंची ठिकाणं आणि त्यांचा खात्मा करण्यासाठी याची मदत होईल.

सर्जिकल स्ट्राईक करण्यात भारतीय जवान कुशल आहेत. वाळवंट असो किंवा रक्त गोठवणारा बर्फाळ प्रदेश असो भारताचे जवान कोणत्याही परिस्थितीत चोख उत्तर देण्यास तयार आहेत. पण या दरम्यान देशांची संपत्ती आणि अनेक लढाऊ सामग्रीचं नुकसान होतं. आता हे नुकसान होऊ नये म्हणून आय़आयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनी एक नवा शोध लावला आहे. ज्यामुळे भारतीय जवान, त्यांचे शस्त्र आणि रणगोडे सुद्धा दिसणार नाही आहेत.

या मेटामटेरियल तंत्रज्ञानाची माहिती घेण्याआधी जवान आणि त्यांची युद्ध सामग्री शत्रूंच्या नजरेत कशी येते याची माहिती घेणे आवश्यक आहे. अंधारात व्यक्ती किंवा वस्तू हिट रेडिएशनमुळे शरीराच्या तापमानाने व्यक्तीचं अस्तीत्व दिसून येतं. रडारचे तरंग विमानाला धडकल्याने त्याचे संकेत देखील मिळतात. पण मेटामटेरियल हे आवरणाचं काम करणार आहे.

असं होणार अदृश्‍य

सगळेच मेटीरियल पदार्थ हे नैसर्गिकरित्या बनलेले आहेत. पण मेटामटेरियल हे प्लास्टिक सारख्या तत्वांपासून बनलेले एक धातू आहे. विद्युत चुंबकीय तरंगांमध्ये हेरफेर करण्यासाठी हे मेटामटेरियल आवरणाचं काम करतील.

मिस्टर इंडिया सिनेमा

वैज्ञानिकांच्या हा शोध 1987 मध्ये आलेला सुपरहिट सिनेमा मिस्टर इंडियाच्या आधारे लावल्याचं म्हटलं आहे. या सिनेमात अनिक कपूर हातात एक घड्याळ घातल्यानंतर अदृष्य होतो. या सिद्धांतावर याचा शोध लावल्याचै वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

आयआयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, जर त्यांनी शोधलेल्या या धातूचे वस्त्र जर जवानांनी घातले तर ते अदृष्य नाही होणार पण अंधारात रात्रीच्या वेळी ते शत्रूच्या कॅमेऱ्यात दिसणार नाहीत. या धातूचे कपडे घातल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आरएफ सेंसर, ग्राउंड रडार, एडवांस बॅटल फील्ड रडार आणि इंफ्रारेड कॅमरे तुम्हाला शोधू शकणार नाहीत.

भारत अमेरिकेच्या पुढे 

अमेरिकेने देखील असाचं एक धातू विकसित केला आहे. पण हा धातू खूप वजनदार आहे. याचा वापर खूप मर्यादीत आहे. आयआयटी कानपूर डीआरडीओने याचं परिक्षण सुरु केलं आहे. परिक्षण झाल्यानंतर भारतीय लष्कर अजून मजबूत होणार आहे.