आग लागल्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत

लुधियानामध्ये औद्योगिक क्षेत्रातील एका इमारतीमध्ये आग लागल्यानंतर ती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका अग्निशमन दल कर्मचा-याचा समावेश आहे. तर १५ हून अधिक जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतेय. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 21, 2017, 03:57 PM IST
आग लागल्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत title=

लुधियाना : लुधियानामध्ये औद्योगिक क्षेत्रातील एका इमारतीमध्ये आग लागल्यानंतर ती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका अग्निशमन दल कर्मचा-याचा समावेश आहे. तर १५ हून अधिक जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतेय. 

सकाळच्या सुमारास मुश्ताक नगर इथल्या एका प्लास्टिक बॅगच्या फॅक्टरी असलेल्या या इमारतीमध्ये आग लागली. यानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आग विझवण्यासाठी इथं दाखल झाल्या. मात्र आग विझवण्याचं काम सुरु असतानाच ही इमारत कोसळली. 

कोसळलेल्या इमारतीच्या ढिगा-याखाली अनेकजण गाडले गेल्याची भीती व्यक्त होतेय. एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून मदत तसंच बचावकार्य सुरु आहे. आगीच्या कारणांचा तपास सुरु आहे.