नवी दिल्ली : दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी एका सोने तस्कराला अटक केली आहे. या तस्कराने आपल्या शरीरात चक्क 28 लाख रूपयांचे सोने लपवले होते.
पोलिसांनी अटक केलेला सोने तस्कर हा दुबईहून भारतात येत होता. मात्र, कस्टम अधिकाऱ्यांना संशय आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. हा तस्कर कोणतीही कस्टम ड्यूटी न देता सोने घेऊन ग्रीन चॅनलमधून निघाला होता. पोलिसांनी त्याच्याकडून 28 लाख रूपयांचे सोने तब्यात घेतले. इतक्या किमतीचे सोने शरीरात लपवल्याने पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले.
कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केलेला हा आरोपी 30 वर्षे वयाचा असून दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. हा तस्कर स्पाईसजेटच्या विमान टी-3ने विमानतळावर उतरला. पोलिसांनी ताब्यात घेतलेला व्यक्ती हा विमानतळावरून अत्यंत सावकाश रितीने चालला होता. त्याच्या हळूहळू चालण्यामुळे कस्टम अधिकाऱ्यांना संशय आला. हा व्यक्ती ग्रीन चॅनल पार करेपर्यंत अधिकाऱ्यांनी वाट पाहिली आणि ग्रीन चॅनल पार करताच त्याला ताब्यात घेतले.
केवळ संशय आला म्हणून ताब्यात घेतल्यावर अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने काहीही सांगितले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याच्यकडे सत्कीने चौकशी केल्यावर त्याने माहिती देण्यास सुरूवात केली. त्याच्याकडून 1 किलो सोन्याचे 8 बार मिळाले.