Tax Regime: ओल्ड की न्यू टॅक्स रिजीम? तुमच्या फायद्याचं काय?

Old or New Tax Regime: आयटीआर भरताना सरकारने टॅक्स पेअर्सना नवीन किंवा जुनी कर व्यवस्था निवडण्याचा पर्याय दिला आहे. 

Updated: Jan 4, 2024, 04:50 PM IST
Tax Regime: ओल्ड की न्यू टॅक्स रिजीम? तुमच्या फायद्याचं काय? title=

Old or New Tax Regime: तुम्ही दरवर्षी ITR भरत असाल तक जुन्या आणि नवीन कर प्रणालीबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच आयकर रिटर्न भरणार असाल तर तुमच्यासाठी हे आणखी महत्वाचे आहे. जुन्या आणि नवीन कर प्रणालीबद्दल संभ्रमात असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ओल्ड आणि न्यू यातील कोणती व्यवस्था निवडावी? असा प्रश्न विचारला जातो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

 वित्त मंत्रालयाने एप्रिल 2020 मध्ये नवीन कर व्यवस्था लागू केली होती. सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीमध्ये काही बदल केले. अधिक लोकांना न्यू टॅक्स रिजीम निवडण्यास प्रोत्साहित केले जात आहे. सुव्यवस्थित टॅक्स स्लॅब, उच्च कर सूट मर्यादा, स्टॅंडर्ड डिडक्शन, फॅमिली पेन्शन डिडक्शन आणि हायर लिव्ह एनकॅशमेंट सुविधा देण्यात आल्या आहेत. वित्त मंत्रालयाने नवीन कर प्रणालीमध्ये बदल केल्यानंतरही सरकारने जुनी कर व्यवस्था रद्द केली नाही. त्यात कोणताही बदल झाला नसून ती तशीच चालू आहे.  करता चालू आहे.

आयटीआर भरताना सरकारने टॅक्स पेअर्सना नवीन किंवा जुनी कर व्यवस्था निवडण्याचा पर्याय दिला आहे. बहुतांश करदाते अजूनही जुनी कर व्यवस्था निवडतात. असे असताना अनेक लोक नवीन आणि जुन्या कर प्रणालीबद्दल संभ्रमात आहेत. टॅक्स भरताना तुम्ही केलेला दावा आणि सवलत यावर ओल्ड किंवा न्यू रिजीम अवलंबून असते.

ओल्ड टॅक्स रिजीम कोणाच्या फायद्याचे?

जर तुम्ही टॅक्स सेव्हिंग योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर जुनी कर व्यवस्था तुमच्यासाठी चांगली आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कर बचत योजनेत गुंतवणूक करत नसाल तर अशा लोकांसाठी नवीन कर व्यवस्था अधिक चांगली ठरू शकते. नवीन कर प्रणाली अंतर्गत, कोणत्याही करदात्याला कलम 80C, 80D, HRA इत्यादींच्या आधारे कर सवलत मिळत नाही.

न्यू टॅक्स रिजीम कोणाच्या फायद्याचे?

सामान्यतः, हायर टॅक्स स्लॅबमध्ये येणारी आणि मर्यादित कपात आणि सूट मिळवणारी कोणतीही व्यक्ती नवीन कर प्रणालीचा पर्याय निवडण्यास प्राधान्य देते. पण जर तुम्ही पीएफ, पीपीएफ, इक्विटी लिंक्ड, ईएलएसएस इत्यादी कर बचत योजनांमध्ये असाल तर जुनी कर व्यवस्था अधिक फायदेशीर ठरू शकते.

जुनी विरुद्ध नवीन कर व्यवस्था

केंद्र सरकारने 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात, न्यू टॅक्स रिजीमला प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक करण्यात आले. यामध्ये सरकारने स्टँडर्ड डिडक्शनचे खास गिफ्ट दिले होते. याशिवाय कर सवलत मर्यादा 2 लाख रुपये करण्यात आली. तर जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

आता या दोघांमध्ये कोणते रिजीम चांगले? असा तुमचा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर सोपे आहे. जुन्या कर प्रणालीनुसार, 80C पासून प्राप्तिकराच्या विविध तरतुदींनुसार गुंतवणूक करण्यास सवलत आहे. तुम्ही वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर जुनी कर व्यवस्था तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. पण जर तुम्ही गुंतवणूक करत नसाल तर नवीन कर व्यवस्था तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.