Budget 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता नव्या संसद भवनात अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पाच्या आधीच केंद्र सरकार गुडन्यूज मिळाली आहे. अर्थमंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीत वस्तु व सेवा कर (GST) संकलनात 10.4 टक्क्यांनी वाढ होऊन 1.72 कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक मासिक संकलन आहे.
अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024मध्ये महिनाअखेर संध्याकाळी 5 पर्यंत एकत्रीत जीएसटी संकलन 1.72,129 कोटी रुपये झाले आहेत. मागील वर्षाच्या जानेवारीत महिनाअखेर संध्याकाळी 1.55,922 कोटी झाले होते. म्हणजेच या महिन्यात मागीस वर्षांच्या तुलनेत 10.4 टक्के अधिक आहे.
चालु आर्थिक वर्षात एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान एकूण जीएसटी संकलन 11.6 टक्के वाढले आहे. या 10 महिन्यात हा आकडा एक वर्षांत 14.96 लाख कोटीने वाढून 16.69 लाख कोटीपर्यंत पोहोचला आहे. एप्रिल 2023मध्ये आत्तापर्यंतचा सर्वाधिक मासिक जीएसटी संकलन 1.87 लाख कोटीपर्यंत नोंदवले गेले आहे.
लोकसभा निवडणुकीचे वर्षे असल्यामुळं 2024-25 या वर्षांसाठी पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नसला तरी अर्थसंकल्पातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प पूर्ण नसला तरी अनेकांना या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा असणार आहेत. सरकारही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध घोषणा करण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षासाठी 7.3 टक्के जीडीपी राहिल असा दावा केला आहे. देशात आर्थिकस्थिती स्थिर असून सेवा क्षेत्राची निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. तसंच, तेलाच्या आयातीत घट करण्यात सरकार यशस्वी झाले आहे.