Budget Expectations: बजेटसाठी आता फक्त काही दिवसच उरले आहेत त्यामुळे सगळ्यांचे लक्ष हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यावेळी बजेटमध्ये काय काय गोष्टी आणणार आहेत याकडे आहे. यंदाच्या बजेटमधून लोकांच्या काय काय अपेक्षा (Expectations) आहेत यावरही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होताना दिसते आहे. त्यातून अनेकांच्या अपेक्षा या रोजगार (Employment) आणि त्यावर घेण्यात येणाऱ्या निर्णयांवरती आहेत. यावेळी नोकरदारांच्या हाती काय पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वांनाच टॅक्सवरती लक्ष केंद्रीत करावे लागते. आपले उत्पन्न हे कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये येते याकडेही सर्वांचे लक्ष असते. मग त्यात काही वाढ होणार का किंवा कोणते बदल पाहायला मिळतील यावरही नोकरदारवर्ग लक्ष ठेवून असतो. सध्याच्या केंद्राच्या अर्थसंकल्पात 2023-24 या आर्थिक वर्षातही अनेकांचेही लक्ष याच गोष्टीकडे जास्त असेल. (Budget 2023 will this budget focuses more on employment tax slab)
यावर करावर आणि रोजगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली सूट मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा या दोन्ही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यंदा येत्या बजेटमधून लोकांच्या अपेक्षा खूप आहे त्यातून वाढत्या महागाईमुळे यावेळी बजेटमधून टॅक्सधारकांसह (Tax Slab) कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आत्तापर्यंत एफएमसीजी, एमएसएमई, बॅकिंग आणि प्रोडक्शन म्हणजेच उत्पादन या क्षेत्रांकडे सबळ रोजगारनिर्मिती म्हणून पाहिले जाते त्यामुळे यंदाही याचाच विचार करून रोजगारनिर्मिती आणि विकासाकडे (Employment News) लक्ष दिले जाणार आहे.
येत्या काळात वैयक्तिक विकासावरही भर दिला जाणार आहे. आत्तापर्यंत रोजगारनिर्मिती क्षेत्रात केंद्र सरकारानं अनेक माध्यमांतून पुढाकार घेतल्याचे दिसते आहे. त्यातून आता ग्रामीण भागातही अनेकांना रोजगारनिर्मितीची मुभा मिळते आहे. याचाच दृष्टिकोनातून यंदाही ग्रामीण भागात खर्च आणि पायाभूत सुविधा वाढविण्याच्या विचारानं प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे सध्या येत्या बजेटमध्येही या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाणार आहे, असं काही तज्ञांचे मतं आहे. गेल्या दोनएक आर्थिक वर्षातील हिस्ट्री पाहता आता केंद्र सरकारनं टॅक्स कलेक्शनही (Tax Collection) फार मोठ्या प्रमाणात केले आहे.
काही तज्ञांचे असेही मतं आहे की पुढल्या वर्षी केंद्राकडून प्रत्यक्ष करावर सूट दिले जाऊ शकते. येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीवर भर दिला जाणार आहे. येते वर्षे हे सगळ्यांसाठीच फार कठीण आहे. एकीकडे जगभरात नोकरकपात सुरू आहे. थोडेथोडके नाही तर हजारोंच्या संख्येनं अख्ख्या जगात नोकरकपात (Lay off) सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्यासोबत वाढती महागाई आणि करभरणी यामुळे त्रासलेल्या वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.