Union Budget 2023: अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं मोदींचं 'सप्तर्षी' मिशन काय आहे?

देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने (Modi Government) सात घटकांना महत्त्व दिलं असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.   

Updated: Feb 1, 2023, 01:24 PM IST
Union Budget 2023: अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं मोदींचं 'सप्तर्षी' मिशन काय आहे? title=

Seven Priorities of Budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेती, मत्सव्यवसाय, शिक्षण, आरोग्य अशा सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान यावेळी बोलताना निर्मला सीतारमण यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाठी यंदाच्या बजेटमध्ये सात गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याचं सांगितलं. 

देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने (Modi Government) सात घटकांना महत्त्व दिलं असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करताना सांगितलं. हे सात घटक कोणते आहेत हे खाली नमूद केले आहेत. 

1) सर्वसमावेशक विकास
2) शेवटच्या घटकापर्यंत विकास 
3) पायाभूत सुविधांचा विकास
4) क्षमतांमध्ये वाढ करणे
5) ग्रीन विकास
6) युवाशक्ती
7) आर्थिक क्षेत्र

केंद्र सरकारने सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसंच दुसरीकडे मोबाईल, एलईडी टीव्हीसारख्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. मात्र सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा भाग असणारं सोने-चांदी मात्र महागणार आहे. 

काय स्वस्त होणार?

1) एलईडी टीव्ही 
2) टीव्हीचे सूटे भाग
2) इलेक्ट्रिक वस्तू
3) मोबाईल फोन, पार्ट्स 
4) इलेक्ट्रिक वाहने 
5) खेळणी
6) कॅमेरा लेन्स

काय महागणार?

1) सोन्याचे दागिने 
2) चांदीचे दागिने
3) चांदीची भांडी
4) विदेशी किचन चिमणी
5) सिगरेट