Budget 2021 आधी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 406 अंकांनी वधारला

याच बजेचच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार उघडताच आज मोठी उसळी पाहायला मिळाली. सकाळी शेअर बाजारात आज तेजीचं वातावरण आहे.

Updated: Feb 1, 2021, 10:07 AM IST
Budget 2021 आधी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 406 अंकांनी वधारला title=

मुंबई: कोरोनाकाळातील देशाचं पहिलं बजेट आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. या बजेटमधून शेतकरी आणि बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर गृहिणींपासून ते व्यावसायिकांपर्यंत काय महाग होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज संसदेत सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

हा अर्थसंकल्प कोरोनानंतरचा असल्यानं विशेष ठरणार आहे. याच बजेचच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार उघडताच आज मोठी उसळी पाहायला मिळाली. सकाळी शेअर बाजारात आज तेजीचं वातावरण आहे. बजेट सादर होण्याआधीच शेअर बजारात सेन्सेक्स वधारला आहे. बजेटआधी शेअर बाजारात तेजीचं वातावरण आहे.

सेन्सेक्स 406 अंकांनी, निफ्टी 80 अंकांनी वधारला आहे. शुक्रवारी शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण दिसून आली. त्या दिवशी सेन्सेक्स 588 पेक्षा जास्त अंकांनी खाली आला तर निफ्टी जवळपास 183 अंकांनी घसरला होता. मात्र आज बजेटच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शेअर बाजारात तेजीचं वातावरण आहे.

मुंबई शेअर बाजार उघडताच निर्देशांक सेन्सेक्स आज 406.59 अंकानी वधारला असून सेन्सेक्स 46,692.36 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 129.55 ने तेजीत आहे. निफ्टीचा आकडाही 13,764.15 वर पोहोचला आहे. आजच्या बजेटचा मोठा परिणाम शेअर बाजारावर होणार आहे. ही तेजी कायम राहणार का ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे तेलाचे दर वाढल्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून इंधन वधारलं आहे. आज इंधनाचे दर स्थिर असले तरी बजेटनंतर इंधन आणि सोनं महाग होणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज सकाळी 11 वाजता संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करणार आहेत.