Budget 2021 : बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

शेतकऱ्यांना मिळणार कामाचा मोबदला 

Updated: Jan 31, 2021, 03:35 PM IST
Budget 2021 : बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी  title=

मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन झालं आणि त्याचसोबत अनेक संकटाच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी देशाला आर्थिक मदत केली. शेतकऱ्यांमुळेच देशातील आर्थिक स्थिती टिकून (Farmer Budget2021)  राहिली आहे. आता सरकार शेतकऱ्यांच्या या कामाचा मोबदला देण्याचा विचार करत आहे. बजेट २०२१ मध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा (Big Announctment) करणार आहे. 

शेतकऱ्यांना महागड्या कर्जापासून मुक्त करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) ची सुरूवात केली होती. याचा खूप फायदा शेतकऱ्यांना झाला. आता सरकार शेतकऱ्यांच्या या किसान क्रेडिट कार्डाची लिमीट आणखी वाढवणार आहे. जेणे करून शेतकऱ्यांना याचा आणखी फायदा व्हावा. 

आता आहे एवढी लिमिट 

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांना लोन दिला जातो. बाजारभावापेक्षा कमी दराचं व्याज आकारून कर्ज दिलं जातं. ७ टक्के वर्षाला व्याज आकारून KCC मार्फत शेतकऱ्यांच्या गरजा भागवल्या जातात. जर वेळे अगोदरच शेतकऱ्यांनी कर्ज भरलं तर ३ टक्के सूट दिली जाते. याचा अर्थ असा असतो की ४ टक्केच व्याज शेतकऱ्यांना भरायचं असतं. 

  

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतीचा विमा देखील काढू शकतो. कोणत्याही कारणामुळे नुकसान झाले तर त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळतो.