बजेट २०१८ : स्वस्त झाल्या फक्त या '४' गोष्टी...

 नवे बजेट सामान्य नागरिकांसाठी फारसे दिलासादायक नव्हते. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 1, 2018, 10:24 PM IST
बजेट २०१८ : स्वस्त झाल्या फक्त या '४' गोष्टी... title=

नवी दिल्ली : नवे बजेट सामान्य नागरिकांसाठी फारसे दिलासादायक नव्हते. महत्त्वाचे म्हणजे टॅक्समध्ये काहीच बदल केलेले नाहीत. आणि शेअर बाजारात रिटर्नसवर देखील टॅक्स भरावा लागणार आहे.
पण काय स्वस्त झाले आणि काय महागले, याबद्दल सामान्य जनतेत उत्सुकता असते.

सरकारच्या या नव्या बजेटमध्ये काही वस्तू महागल्या. आणि फक्त चार वस्तू स्वस्त झाल्या. अर्थसंकल्प २०१८ : सर्वसामान्यांना जेटलींच्या बजेटमधून आहेत या अपेक्षा!

  • कच्च्या काजूंवरील कस्टम ड्यूटी काढून २.५% करण्यात आली.
  • सौर पॅनल मॉड्यूल्सच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे सौर टेंपर्ड ग्लास.
  • कॉक्लियर इम्प्लांटमध्ये वापरला जाणार कच्चा माल किंवा एक्सेसरीज.
  • इलेक्ट्रानिक्स सामान बॉल स्क्रू आणि लिनीयर मोशन गाईड इत्यादी.