वहिनी आणि दीर शूट करायचे न्यूड व्हिडीओ, अन् नंतर कुटुंबासह...; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

झारखंडमध्ये पोलिसांनी सेक्स्टॉर्शन करणाऱ्या वहिनी आणि दीराला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 मोबाईल फोन सेट आणि 6 सीमकार्ड जप्त केले आहेत.  

शिवराज यादव | Updated: Nov 28, 2023, 04:46 PM IST
वहिनी आणि दीर शूट करायचे न्यूड व्हिडीओ, अन् नंतर कुटुंबासह...; पोलिसांनी ठोकल्या बेड्या title=

झारखंडमध्ये पोलिसांनी सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना अटक केली आहे. तसंच तिसरा आरोपी फरार आहे. आरोपी न्यूड व्हिडीओ आणि कॉल रेकॉर्ड करत ब्लॅकमेल करत असतं. पोलिसांना त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. पोलिसांना छापेमारी करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका पीडितेने पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली. यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत सायबरचे डीएसपी संदीप सुमन समदर्शी यांच्या नेतृत्वात एक पथक गठीत केलं. हे पथक गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत होतं. 

सेक्स्टॉर्शन करुन ब्लॅकमेल करणाऱ्या वहिनी आणि दीराला अटक

मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी सरिया पोलीस ठाणे क्षेत्राच्या नगर केशवारी गावातून 21 वर्षीय विकास मंडल आणि सृष्टी कुमारी (21) यांना अटक केली. सृष्टीचा पती सिकंदम मंडल फरार होण्यात यशस्वी झाला आहे. विकास आणि सृष्टी हे वहिनी-दीर आहेत. 

पोलिसांनी अटक केलेल्या वहिनी आणि दीराकडून 5 मोबाईल फोन आणि 6 सीमकार्ड जप्त केले आहेत. या कुटुंबातील इतर सदस्यही या ब्लॅकमेलिंगमध्ये सहभागी होते असा पोलिसांना संशय आहे. आरोपींनी चौकशीत पोलिसांना सांगितलं आहे की, व्हॉट्सअप कॉल करुन ते तरुणांना मसाजसाठी बोलवत असत. 

न्यूड व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे करायचे ब्लॅकमेल

मसाजसाठी येणाऱ्या तरुणांचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ काढून ते ब्लॅकमेल करत पैसे उकळत असत. गेल्या सहा महिन्यात आरोपींनी डझनहून अधिक लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. पोलिसांनी केशवारी गाव आता सायबर गुन्हेगारीसाठी मोठा अड्डा झाल्याचं सांगितलं आहे. 

गिरीहीडचे एसपी दीपक कुमार शर्मा यांनी सांगितलं आहे की, सायबर गुन्हेगारांना अटक केल्यानंतर अनेक नवी प्रकरणं उघड होऊ लागली आहेत. अश्लील व्हिडीओ तयार करत लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यासाठी सृष्टी कुमारी नावाच्या महिलेला विशेष ट्रेनिंग देण्यात आली होती. पोलिसांनी लोकांना आणि खासकरुन तरुणांना अशा गुन्ह्यात अडकू नये यासाठी सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे.