Brother and Sister Marriage : पैशांचा लोभापोटी भाऊ-बहिणीने घेतले 'सात फेरे'; काय आहे नेमकं प्रकरण?

Brother and Sister Marriage : एका लग्नाची विचित्र गोष्ट समोर आली आहे. पैशांच्या लोभापोटी चक्क भाऊ बहिणीने लग्न केलं. या घटनेनंतर एक खळबळ माजलीय. 

नेहा चौधरी | Updated: Oct 7, 2024, 03:55 PM IST
Brother and Sister Marriage : पैशांचा लोभापोटी भाऊ-बहिणीने घेतले 'सात फेरे'; काय आहे नेमकं प्रकरण? title=
Brother and Sister Marriage for get money government scheme benefits viral news

Brother and Sister Marriage : लग्न हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र विधी मानला जातो. काही नाती अशी असतात ज्यामध्ये लग्न होऊ शकत नाही. भाऊ बहीणचं नातही असंच आहे. पण गेल्या काही काळामध्ये बहीण भावाच्या लग्नाचा बातम्या समोर येत आहेत. नुकताच एका सामुहिक विवाहात असंच एक बहीण भावाचं लग्न पाहिला मिळालं. या बहीण भावाने लग्न का केलं यामागील कारण कळल्यावर संताप होतो. 

...म्हणून 'त्यानं' चक्क आपल्याच बहिणीशी लग्न केलं

सरकारी योजनेचा (Government Scheme) लाभ मिळवण्यासाठी एका पठ्ठ्यानं चक्क आपल्याच बहिणीसोबत लग्न (Marriage) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये!
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत  वधूच्या बँक खात्यात 35,000 रुपये, जोडप्यासाठी 10,000 रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तू याशिवाय विवाह सोहळ्यासाठी 6,000 रुपये खर्च करण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. हा लाभ मिळवण्यासाठी एका भावाने आपल्याच बहिणीशी लग्न केलं. 

समाजातील आर्थिक दुर्बल घटकांतील नवविवाहित जोडप्यांना सरकारी योजनाचा लाभ मिळावा म्हणून ही तरतूद करण्यात आली. पण उत्तर प्रदेशातील या सामुहिक विवाहात धक्कादायक घटना घडली. सिकंदरराव येथे राहणाऱ्या दोन विवाहित जोडप्यांचे या योजनेअंतर्गत पुनर्विवाह करण्यात आले. याशिवाय भाऊ आणि बहिणीने एकमेकांशी लग्न केल्याची घटनाही समोर आलीय. स्थानिक रहिवाशांनी हा मुद्दा एसडीएमकडे मांडला, ज्यामुळे चौकशीचे आदेश देण्यात आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तक्रारकर्त्यांचा आरोप आहे की, सामुदायिक विवाह योजनेंतर्गत पैसे मिळवण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्याने हे बनावट विवाह लावले. एसडीएम वेदसिंह चौहान यांनी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.