ICICI Bank, HCL, RIL सारखे ब्लूचिपमधून धमाकेदार कमाईची संधी; बड्या ब्रोकरेजचीही पसंती

 बाजाराच्या रेकॉर्ड तेजीमध्ये शेअर्सचे वॅल्युएशन जास्त झाले आहे. या स्थितीत लार्ज कॅप सेगमेंटमधील दमदार शेअर तुमच्या गुंतवणूकीसाठी सुरक्षित पर्याय ठरू शकतात

Updated: Sep 16, 2021, 12:45 PM IST
ICICI Bank, HCL, RIL सारखे ब्लूचिपमधून धमाकेदार कमाईची संधी; बड्या ब्रोकरेजचीही पसंती title=

मुंबई : बाजाराच्या रेकॉर्ड तेजीमध्ये शेअर्सचे वॅल्युएशन जास्त झाले आहे. या स्थितीत लार्ज कॅप सेगमेंटमधील दमदार शेअर तुमच्या गुंतवणूकीसाठी सुरक्षित पर्याय ठरू शकतात. तुम्ही अशा लार्ज कॅप शेअर्सच्या शोधात असाल तर ब्रोकरेज हाऊसच्या या लेटेस्ट रिपोर्टचा फायदा घेऊ शकता. ब्रोकरेज हाऊसने आज काही ब्लूचिप  शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. यामध्ये ICICI Bank, HCL आणि RIL सामिल आहे. तसेच ब्रोकरेजने ZOMATO मध्ये अंडरवेट रेटिंग देऊन शेअरचे टार्गेट सध्याच्या किंमतीपेक्षा कमी केले आहे.

HCL Tech
आयटी सेक्टरमधील ही दिग्गज कंपनी आहे. ब्रोकरेज हाऊस CLSA ने खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी 1470 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. ब्रोकरेज हाऊसने याआधी 1320 रुपयांचे लक्ष ठेवले होते. सध्या हा शेअर 1270 रुपयांवर ट्रेड करीत आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, HCL Tech ईपीएसमध्ये 2 ते 5 टक्क्यांची वाढ शक्य आहे. कंपनीचे ऑर्डरबुक चांगले आहे.

ICICI Bank
खासगी क्षेत्रातील मोठी बँक  असलेल्या ICICI Bank बाबत ब्रोकरेज हाऊस बुलिश आहेत. ब्रोकरेज हाऊस CLSAने शेअरसाठी 1000 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. या आधी ब्रोकरेजने शेअरसाठी 940 रुपयांचे लक्ष दिले होते. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, बँकेच्या इंटरेस्ट मार्जिनमध्ये चांगला परफॉर्मन्स पहायला मिळाला आहे.

RIL
रिलायन्सच्या शेअर्ससाठी ब्रोकरेज हाऊस मार्गन स्टैनलेने ओवरवेट रेटिंग दिली आहे. या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देण्यात आला आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीबाबत सरकार ज्या प्रकारे निर्णय घेत आहे, त्यामुळे या सेक्टरची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. यामुळे जिओसह सर्व कंपन्यांना त्याचा लाभ होईल.

ZOMATO
या शेअर्यच्या बाबतीत निगेटिव रिपोर्ट आली असून, ब्रोकरेज हाऊस मॉर्गनेने शेअरला अंडरवेट रेटिंग दिली आहे. यासाठीचे लक्ष 120 रुपये करण्यात आले आहे. सध्या हा शेअर 142 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे.