आपले पंतप्रधान कोण? नवरदेवाला उत्तर आलं नाही नवरीने दिरासोबत घेतले सात फेरे

Bride Broke Her Marriage: नवरीच्या बहिणीने नवरदेवाला देशाच्या पंतप्रधानांचे नाव विचारले, नवरदेवाला उत्तर देता आलं नाही. नवरीने थेट लग्नच मोडले

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 19, 2023, 06:26 PM IST
आपले पंतप्रधान कोण? नवरदेवाला उत्तर आलं नाही नवरीने दिरासोबत घेतले सात फेरे title=
आपले पंतप्रधान कोण? नवरदेवाला उत्तर आलं नाही नवरीने दिरासोबत घेतले सात फेरे| bride rejects groom for not knowing pm narendra modi name

Bride Reject Groom: लग्नानंतर महिलेच्या सासरच्यांनी तिला माहेरी पाठवण्यास नकार दिला. सासरच्यांची ही भूमिका पाहून वधूच्या घरच्यांनी 112 नंबरवर फोन करत पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचताच घडलेला सगळा प्रकार पाहून हैराण झाले आहेत. 

11 जून रोजी करंडा भागात लग्नासाठी सगळे जमले होते. थोड्याच वेळात लग्नाचे इतर विधी सुरु होणार होते. नवरीच्या बहिणीने नवरदेवाला देशाच्या पंतप्रधानांचे नाव विचारले. मात्र त्याला उत्तर देता आलं नाही. त्यानंतर नवरीच्या मैत्रिणीचे मैत्रिणीने त्याला अनेक प्रश्न विचारले, पण नवरदेवाला त्याचंही उत्तर देता आलं नाही. नवरदेवाच्या या वागण्याने नवरीला शंका आली. 

लहान मुलासोबत लग्न लावलं

नववधूने नवरदेवाच्या या वागण्यामुळं लग्नाला नकार दिला. नवरदेव गतीमंद असल्याचं म्हणत ती लग्नाला उभी राहणार नसल्याचं तिने म्हटलं. त्यानंतर घरातल्याच्या दबावामुळं तिचे नवरदेवाच्या लहान भावासोबत लग्न लावण्यात आलं.लग्न झालं मुलीची पाठवणीदेखील करण्यात आली. नवरी सासरी आल्यानंतर पुढील विधीसाठी तिच्या माहेराहून काही माणसं आले मात्र सासरच्यांनी तिला पाठवण्यास नकार दिला. शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. 

काय घडलं नेमकं?

नसीरपूर गावातील शिव शंकर नावाच्या मुलाचं रंजनासोबत ठरलं होतं. 11 जून रोजी तो वरात घेऊन मुलीच्या घरीदेखील पोहोचला होता. रात्री दोघांचे लग्नदेखील झाले. मात्र, सकाळी एक विधी करण्यासाठी सगळे जमले असताना नवरीच्या बहिणीने काही प्रश्न विचारले. मात्र, नवरदेव या प्रश्नांची उत्तर देऊ शकला नाही. त्यावेळी नवरीमुलीच्या कुटुंबीयांनी नवरदेवाची अधिक चौकशी केली असता तो गतीमंद असल्याचं कळलं. 

मुलाच्या वडिलांनी आरोप केला आहे की, आम्ही मुलीचं लग्न आमच्या मोठ्या मुलासोबत ठरवलं होतं. मात्र तिथे गेल्यावर मुलीने व तिच्या घरच्यांनी मुलगा गतिमंद असल्याचे सांगून लग्न करण्यास नकार दिला. तरीदेखील आम्ही आमच्या लहान मुलासोबत लग्न लावले. आमच्या छोट्या मुलाचे वयदेखील मुलीपेक्षा कमी आहे तरी आम्ही तयार झालो. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाला मान्यता दिली. 

शनिवारी सुनेचे नातेवाईक घरी आले आणि ते जबरदस्ती तिला इथून घेऊन जाऊ लागले. तेव्हा मुलाच्या वडिलांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलिसांनी दोन्हीकडील लोकांना पोलिस ठाण्यात बोलवलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत कोणीही याप्रकरणी तक्रार दाखल केलेली नाहीये. मुलीच्या घरच्यांनी 112 क्रमांकावर फोन करुन याची सूचना दिली होती. त्यानंतर दोन्ही पक्षाकडील लोकांनी एकमेकांसोबत बोलणी करुन प्रकरण सोडवले आहे. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले आहे.