लग्नमंडपात नवरदेवाला एन्ट्रीसाठी मेव्हणीनं दिलं भन्नाट चॅलेन्ज; पाहा मजेदार Video

भाऊजी-मेव्हणीचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. 

Updated: Aug 10, 2022, 02:01 PM IST
लग्नमंडपात नवरदेवाला एन्ट्रीसाठी मेव्हणीनं दिलं भन्नाट चॅलेन्ज; पाहा मजेदार Video  title=
bride groom video jija saali funny wedding gave a challenge trending video in marathi

Bride Groom Video : लग्नसोहळा हा वधू-वर (Bride-Groom)आणि दोन्ही कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो. वधू-वरांसोबत हा सोहळ्यासाठी सगळ्यात जास्त उत्साही दिसतात त्या वधूच्या बहिणींमध्ये. तर नवरदेवाकडून त्याचे भाऊ आणि मित्रमंडळी तेवढेच उत्साही असतात. 

सोशल मीडियावर ( Social Media) लग्नातील (Wedding)अनेक मजेदार व्हिडीओ (Funny Video) तुम्ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नातील धम्माल व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा होते आहे. भाऊजी-मेव्हणीचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. 

मेव्हणीने दिलं भाऊजीना चॅलेन्ज

ढोलताशांच्या गजरात नवरदेव नवरीला घेऊन जाण्यासाठी विवाह मंडपाच्या दारात आला. नवरदेवाच्या स्वागतासाठी वधू पक्षाकडील मंडळी उपस्थित होती. आपल्या लाडक्या भाऊजींच्या खास स्वागतासाठी मेव्हणी सज्ज होती. कोणी कल्पनाही करु शकणार नाही असं चॅलेन्ज मेव्हणीने नवरदेवाला दिलं. (bride groom video jija saali funny wedding gave a challenge trending video in marathi)

हे चॅलेन्ज पूर्ण करा मग मंडपात स्वागत

मेव्हणीने नवरदेव आणि त्याचा मित्रमंडळीला लग्नमंडपात एन्ट्री हवी असेल तर गोल पोळी बनवण्याचं आव्हान दिलं. या वरातील एका मित्राने कसलीही लाज न बाळगता हातात पीठ घेतलं आणि गोल पोळी करण्यास सुरुवात केली. 

सूट-बूट गॉगलवाला हा तरुण मस्त गोल पोळी करु लागला आणि त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावरील या तरुणांचं कौतुक होतं आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर wedabout नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 4 हजारांहून अधिक लाइक मिळाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by WedAbout.com (@wedabout)