लग्नमंडपात वधु-वराची Free style wrestling, वारंवार पाहिला जातोय हा Viral Video

वधू आणि वर लग्नमंडपात बसले आहेत आणि अचानक वधू दुर्गेचं अवतार धारण करते.

Updated: Aug 9, 2022, 04:49 PM IST
लग्नमंडपात वधु-वराची Free style wrestling, वारंवार पाहिला जातोय हा Viral Video  title=
bride groom video angry bride beat up the groom trending video viralon social media in marathi

Bride Groom Video : सोशल मीडियावर अनेक मजेदार आणि भन्नाट व्हिडीओ (Video) आपल्याला पाहिला मिळतात. काही व्हिडीओ पाहून तर आपल्याला हसू आवरत नाही. सोशल मीडियावर यातील काही व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral) होत असतात. असे मजेदार व्हिडीओ यूजर्सला प्रचंड आवडतात आणि असे व्हिडीओ खूप पाहिले जातात. 

सध्या सोशल मीडियावर लग्नमंडपातील मजेदार व्हिडीओ टेंडमध्ये आहेत. असाच एक लग्नमंडपातील व्हिडीओ सोशल मीडियावर यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. (bride groom video angry bride beat up the groom trending video viralon social media in marathi)

नवरीने धारण केलं दुर्गेचं रुप

या व्हिडीओमध्ये पाहू शकता तुम्ही लाल रंगाच्या पोशाखात वधू आणि वर लग्नमंडपात बसले आहेत आणि अचानक वधू दुर्गेचं अवतार धारण करते. या वधूला कसला तरी राग येतो आणि ती आपल्या होणाऱ्या जोडीदारावर मारापीट करण्यास सुरुवात करते. दोघांमध्ये इतकी हाणामारी होते की ते मंडपाचा खाली पडतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं झालं तरी काय? 

हा कुठला विधी तर नाही ना?

हा व्हिडीओ तुम्ही नीट बघितला तर तुमच्या लक्षात येईल की, वधूच्या हातात एक ताट आहे ज्यात एक वाटी आहे. वधू त्या वाटीमधील गोष्ट नवरदेवाच्या चेहऱ्याला लावायला जाते. मात्र नवरदेव विरोध करतो. तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की नवरदेवही त्या वाटीमध्ये असलेली गोष्ट हातात घेतो आणि नववधूला लावण्याचा प्रयत्न करतो. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर हसू आहे. त्यांचा जवळ उभी असलेली महिला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते आहे पण ती वधू कोणालाही ऐकत नाही.  काही क्षणानंतर हे दोघे मंडपाच्या खाली पडतात. 

पहिल्यांदा पाहिल्यावर असं वाटतं की या काही सेकंदांचा व्हिडीओमध्ये वर-वधू एकमेकांशी भांडत आहेत. हा व्हिडीओ 
इन्स्टाग्रामवर kaunhainyehlog नावाच्या युजरने शेअर केला आहे. तर आतापर्यंत हा व्हिडीओला 6 लाखांपेक्षा जास्त लाइक आले आहेत. तर कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तुम्ही पण पाहा हा मजेशीर व्हिडीओ.