लग्नाच्या दिवशी वधूसोबत असं काही झालं..., मेहुणीला करावं लागलं नवरदेवासोबत लग्न

Bride Dies of Heart Attack on Wedding Day : लग्न हे प्रत्येक मुलीसाठी आयुष्यातील खास क्षण असतात. पण गुजरातमध्ये अशी एक घटना घडली की, लग्नाच्या दिवशी नवरीच्या बहिणीला नवदेवासोबत लग्न करावे लागले...

Updated: Mar 2, 2023, 10:26 AM IST
लग्नाच्या दिवशी वधूसोबत असं काही झालं..., मेहुणीला करावं लागलं नवरदेवासोबत लग्न title=

Bride Dies of Heart Attack on Wedding Day : लग्न म्हटलं की (Wedding Video) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर क्षण असतो. या दिवसाची प्रत्येक मुलगी आतुरतेने वाट पाहतं असते. आयुष्याचा पुढचा टप्पा हा या नवऱ्यावर अवलंबून असतो. त्याचं प्रेम, साथ आणि विश्वास यावर नवरा बायकोमधील (Marriage Video) नातं पुढे जात असतं. पण गुजरातच्या भावनगर शहरात लग्न विधी सुरू असताना वधूला हार्टअटॅक आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या दिवशी कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. 

लग्न विधी सुरू असतानाच हार्ट अटॅक

गुजरातमधील सुभाषनगर भागात राहणाऱ्या भरवाड कुटुंबातील जीणा राठोड यांची मोठी मुलगी हेतलचे लग्न नारी गावच्या विशाल राणाभाई यांच्याशी ठरले होते. त्यांचे लग्न बुधवारी होणार होते म्हणन सायंकाळी भावनगरला लग्नासाठी वरात पोहोचली. ठरलेल्या वेळेत लग्नाच्या विधीही सुरू झाल्या. मात्र त्याचवेळी वधु हेतलला अचानक चक्कर आली. 

वाचा: आजपासून दहावीची परीक्षा, केंद्रावर 'हे' नियम पाळा 

लग्नाच्या विधी सुरू असतानाच नवरीला चक्कर आल्यामुळे ती मोकळ्या हवेसाठी छतावर गेली. छतावर गेली असता ती अचानक बेशुद्ध  होऊन पडली. हे पाहून कुटूंबीयांचा एकच आरडाओरड सुरू झाली. त्यावेळी त्यांनी बेशुद्ध अवस्थेत नवरीली नजीकच्या रूग्णालयात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यावेळी डॉक्टरांनी हेतलचा मृत्यू हार्टअटॅकमुळे झाल्याचे घोषित केले. 

मेहूणीसोबत बांधली लग्नगाठ 

हेतलच्या मृत्यूनंतर तिच्या कुटूंबात शोककळा पसरली. यावेळी कुटूंबीयाने हेतलचा मृतदेह रुग्णालयाच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला. त्यानंतर त्यांनी आपल्या छोट्या मुलींचे विशासशी लग्न लावून दिले.