Bride dance with boyfriend: प्रेम म्हणजे प्रेम (Love) असतं, तुमचं आमचं सेम असतं.., ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर (Mangesh Padgaonkar) यांच्या या ओळी कधी जुनाट होणार नाहीत. अनेकदा प्रेमाची भावना अतिशय तीव्र असते तर बऱ्याचदा ती लवकरही विरूनही जाते. मात्र, अनेक अशी प्रेम प्रकरणं (Love Story) असतात, ज्याला न कोणतं बंधन असतं, ना त्या प्रेमाला कोणतं नाव...अशातच एक मजेशीर व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (Bride dance with boyfriend Tujhko hi dulhan banaunga song hug and cry wedding video goes viral marathi news)
सध्या लग्नाचा सिझन (Wedding season) सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये लगीनघाई सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. हा व्हिडीओ पाहून बस एवढंच पहायचं राहिलं होतं, असं अनेकांनी कमेंट करत म्हटलंय.
आणखी वाचा - Video : त्याने तिला मिठ्ठीत घेतलं अन् मग...
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लग्नानंतर बिदाईचा कार्यक्रम सुरू असतो. तुझको ही दुल्हन बनाऊंगा हे गाणं (Tujhko hi dulhan banaunga) वाजवलं जातं. त्यावेळी नव्या नवरीच्या वेशभूषेत प्रेयसीला पाहून प्रेयकराचं भान हरपतं. तो लावलेल्या गाण्यावर नाचू (Bride dance with boyfriend) लागतो. त्यानंतर प्रेयसी देखील सर्वकाही विसरून नाचू लागते.
इस शादी के सीजन में क्या क्या देखना पड़ रहा है pic.twitter.com/WMwXyA3BPD
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) December 15, 2022
दरम्यान, नाचता नाचता प्रेयसीला भरून येतं आणि ती प्रियकराच्या गळ्यात पडून रडू (Bride Cry for boyfriend) लागते. प्रेयकराला देखील रडू कोसळतं आणि तो देखील तिला घट्ट मिठी मारून रडू लागतो. दोघांचं प्रेम पाहून वऱ्ड्यांच्या डोळ्यात देखील पाणी येतं. त्यानंतर एक महिला दोघांना बाजूला करण्याचा प्रयत्न करते, असं व्हिडीओमध्ये (Trending Video) दिसत आहे.