मुंबई : नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नोकरदार वर्गासाठी सरकारने मोठा धक्का दिला आहे. तुमच्या पगारातून कापल्या जाणाऱ्या EPFO वरील व्याज दर कमी करण्यात आलं आहे. याआधी EPFO वर सर्वात जास्त व्याजदर दिलं जात होतं. मात्र ह्या व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे.
केंद्रीय विश्वस्त मंडळ आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या फायनान्स इन्वेस्टमेंट आणि ऑडिट कमिटीशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
2020-21 या आर्थिक वर्षात EPFO ने 8.50 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला होता. EPFO मध्ये जमा केलेल्या पैशांपैकी 15 टक्के रक्कम इक्विटीमध्ये आणि उर्वरित कर्जामध्ये गुंतवली जाते. जर तुम्ही पासबुक नीट पाहिलं तर EPFO च्या आर्थिक वर्ष 2022 साठी PF वरचा व्याज दर 40 वर्षांतील सर्वात कमी म्हणजे 8.1 टक्के करण्यात आला आहे.
FY14 आणि FY15 मध्ये व्याज दर 8.75%
FY16 मधील व्याज दर 8.80%
FY 17 मधील व्याज दर 8.65%
FY18 मधील व्याज दर 8.55%
FY19 मधील व्याज दर 8.65%
FY20 मधील व्याज दर 8.5%
FY 21 मधील व्याज दर 8.5.%