#BoycottMamaEarth : अभिनेत्री रिचा चढढा नंतर आता 'ही' कंपनी होतेय ट्रोल, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

#Boycott Mama Earth: रिचा चढढाच्या ट्विटचा वाद आणखीण पेटला, पण Mama Earth कंपनी का ट्रोल केले जातेय? 

Updated: Nov 25, 2022, 02:37 PM IST
#BoycottMamaEarth : अभिनेत्री रिचा चढढा नंतर आता 'ही' कंपनी होतेय ट्रोल, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण  title=

#Boycott Mama Earth: बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने (Richa Chadha) गलवान ट्विटवर माफी मागून देखील वाद शमला नाही आहे. याउलट हा वाद आणखीण पेटताना दिसत आहे. आता या वादात एका स्किन केअर प्रोडक्ट Boycott Mama Earth विकणाऱ्या कंपनीला देखील ट्रोल केले जात आहे. त्यामुळे या कंपनीने या वादात अशी कोणती भूमिका घेतलीय, ज्यामुळे ते ट्रोल होतायत, हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : Richa Chadha च्‍या गलवान ट्विटवर अक्षय कुमार भडकला, म्हणाला...

काय आहे प्रकरण? 

रिचा चढ्ढाने (Richa Chaddha galwan controversy) सोशल मीडियावर एक ट्विट शेअर केले होते. या ट्विटआधी उत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासारखे आदेश लागू करण्याचे विधान केले होते. यावर रिचानं उपेंद्र द्विवेदी यांच्या व्हिडिओवर ‘गलवान हाय कह रहा है’ असे ट्विट केले होते. या तिच्या (Galwan) गलवानच्या ट्विटमुळे रिचा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. रिचानं तिच्या पोस्टमध्ये तिनं भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर होत होता. तसेच तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील करण्यात आले होते. 

माफिनामा    

दरम्यान लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि भाजपने ट्विटवर आक्षेप घेतल्यानंतर व ट्रोलिंगनंतर अखेर रिचा चढ्ढाने (Richa Chaddha galwan controversy) माफी मागितली आहे. ट्विटवरील वादानंतर रिचा चढ्ढाला माफी मागावी लागली आणि आपल्या कुटुंबाच्या लष्कराशी असलेल्या संबंधाचा दाखला द्यावा लागला आहे. यासोबतच तिने गलवानवरील ट्विटही डिलीट केले होते. 

Mama Earth का होतेय ट्रोल?

रिचा चढ्ढाच्या (Richa Chaddha galwan controversy)  ट्विटवर बॉलिवूडचे अनेक स्टार्स आपआपली प्रतिक्रिया देत आहेत. अक्षय कुमार व द कश्मिर फाईल्सचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने देखील या ट्विटवर टीका केली होती. त्यात आता स्किन केअर प्रॉडक्ट्स कंपनी असलेल्या ममा अर्थने रीचा चढ्ढाचा या वादात बचाव केला होता. एकंदरीत तिच्या ट्विटचे समर्थन केले होते. त्यामुळे आता ममा अर्थचे ट्विट सोशल मीडियावर शेअर करून त्यांना ट्रोल केले जात आहे.  

नेटकरी संतापले? 

ममा अर्थच्या या ट्विटवर नेटिझन्स चांगलेच भडकले आहेत. नेटकऱ्यांनी आता ममाअर्थचा (Mama Earth) ट्विट शेअर करून त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. शेफाली वैद्य नावाच्या युझरने लिहले की, तुम्हाला साबण आणि क्रीम विकायचे आहेत, फुकटच ज्ञान विकू नका! #BoycottMamaEarth असे म्हणत ट्रोल केले आहे. तसेच अश्विन कुमार नावाच्या युझरने देखील कंपनीचे प्रोडक्ट खरेदी करणार नसल्याचे म्हटले आहे. मी माझ्या लहान भाचींसाठी त्यांची उत्पादने खरेदी करायचो आणि यापुढे मी @mamaearthindia पैकी कोणतीही उत्पादने खरेदी करणार नाही आणि माझ्या आसपासच्या प्रत्येकाला त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सांगेन, असे त्याने म्हटले आहे.  

कंपनी कोणते प्रोडक्ट विकतेय?

मामा अर्थ (Mama Earth) ही गुरुग्राम येथील स्टार्टअप कंपनी आहे. ही कंपनी लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी त्वचा आणि आरोग्य सेवा उत्पादने प्रदान करते. 

दरम्यान रिचा चढढाच्या (Richa Chaddha galwan controversy) या ट्विटचा वाद शमतच नाही. हा वाद आणखीण पेटताना दिसत आहे.