नव्या वर्षात रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर

भारतीय रेल्वेत प्रवास करताना आता तुम्हाला स्वादिष्ट भोजनाचाही आस्वाद घेता येणार आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 1, 2018, 04:08 PM IST
नव्या वर्षात रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर title=

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेत प्रवास करताना आता तुम्हाला स्वादिष्ट भोजनाचाही आस्वाद घेता येणार आहे. भारतीय रेल्वेने आणखी एक सुविधा सुरु केलीये. प्रवासादरम्यान तुम्हाला रेल्वेतील जेवण नकोय त्याऐवजी रेल्वेत हॉटेलचे जेवण मिळावे अशी इच्छा असेल तर ते आता शक्य आहे. 

आता प्रवासादरम्यान तुम्ही ५००हून अधिक हॉटेलमधून खाणे ऑर्डर करु शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही अथवा त्यासाठी आधी बुकिंग करण्याचीही गरज नाही. ही खाण्याची ऑर्डर तुम्ही बसल्या बसल्या करु शकता. याशिवाय या ऑर्डरवर तुम्हाला ५ टक्क्यांपर्यंत सूटही मिळू शकते. 

अॅपद्वारे अशी मिळेल सुविधा

रेल्वेच्या ई-कॅटरिंग सर्व्हिसमध्ये मोबाईल अॅप, फोन अथवा ऑनलाईन ५००हून अधिक हॉटेलमधून जेवण ऑर्डर करु शकता. अॅपवरुन जेवण ऑर्डर करण्यासाठी आयआरसीटीसी कॅटरिंग-फूड ऑन ट्रॅक अॅप डाऊनलोड करावे लागेल. अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही जेवण ऑर्डर करु शकता. रेल्वेचे हे अॅप गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करु शकतो.

फोनवरुन अशी करा बुकिंग?

तुम्ही अॅपऐवजी फोनद्वारे डायरेक्ट जेवणाची ऑर्डर देऊ शकता. यासाठी रेल्वेच्या टोल फ्री नंबर १३२३वर कॉल करावे लागेल.

smsसे जेवण बुक करु शकता

अॅप अथवा फोनशिवाय तुम्ही एसएमएसद्वारेही जेवण बुक करु शकता. एसएमएसद्वारे जेवण बुक करण्यासाठी तुम्हाला १३९ नंबरवर मेसेज करावा लागेल. या एसएमएसमध्ये मील टाईप करुन पीएनआर नंबर लिहावे लागेल. 

ऑनलाईन ऑर्डरने जेवण मागवा

रेल्वेने ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलीये. यासाठी http://www.ecatering.irctc.co.in यावरुन तुम्ही जेवण ऑर्डर करु शकता. यासाठी तुम्हाला ५००हून अधिक चांगल्या हॉटेल्सपैकी एक हॉटेल निवडावे लागेल. 

अशी मिळेल ५ टक्के सूट

जर तुम्ही आयआरसीटीसी ई-कॅटरिंगवरुन ऑनलाईन जेवण ऑर्डर करत असाल तर तुम्हाला ऑर्डरवर ५ टक्के सूट मिळेल.