नवी दिल्ली : जोधपूर विमानतळनंतर आता जयपूर, जोधपूर आणि उदयपूर हे 3 रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धमकीचे पत्र पोस्ट खात्याला मिळाल्यानंतर याबाबत लगेचच रेल्वे प्रशासनाला माहिती देण्यात आली.
हे धमकीचं पत्र २९ सप्टेंबरला मिळाले होते. २० आक्टोंबरला जयपूर रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. बिकानेर, गंगानगर, हनुमानगड, चित्तोडगड, उदयपूर, जोधपूर हे रेल्वे स्थानकही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर महत्त्वाची मंदिरे, सिनेमागृह, विमानतळ य़ांची सुरक्षा वाढण्यात आली आहे.
दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचा यात उल्लेख असल्याने याबाबत कोणतीही निष्कळाजी होणार नाही याबाबत पोलिसांनी काळजी घेतली आहे. हाय अलर्ट जारी करत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
काही दिवसांपूवी जोधपूरला जाणारं विमान देखील बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर जोधपूर विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. यानंतर बॉम्ब शोधक पथकाने विमानतळाची तपासणी केली. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली होती.