उदयपूर: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नसमारंभातील कार्यक्रमांना शनिवारपासून सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी भारतातील अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. आमंत्रितांमध्ये अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांचाही समावेश होता. काहीवेळापूर्वीच त्या उदयपूरमध्ये दाखल झाल्या. याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव, बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय, अभिनेता अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, शाहरुख खान, करण जोहर, ए. आर. रहमान, अरजित सिंह, विद्या बालन, जावेद जाफरी, सचिन तेंडुलकर, हेदेखील या हायप्रोफाईल सोहळ्यासाठी उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत.
Rajasthan: Maharashtra CM Devendra Fadnavis, Jaya Bachchan, Abhishek Bachchan-Aishwarya Rai Bachchan,former UP CM Akhilesh Yadav and his wife Dimple Yadav arrive in Udaipur to attend pre-wedding celebrations of Isha Ambani and Anand Piramal. pic.twitter.com/SldNgvKeLU
— ANI (@ANI) December 8, 2018
Rajasthan: Vidya Balan-Siddharth Roy Kapur, John Abraham-Priya Runchal and Javed Jaffrey arrive in Udaipur to attend the wedding of Isha Ambani and Anand Piramal. The couple will tie the knot on December 12 in the city. pic.twitter.com/833h0Ftgq7
— ANI (@ANI) December 8, 2018
Rajasthan: Sachin Tendulkar-Anjali Tendulkar, Priyanka Chopra-Nick Jonas, Sakshi Singh Dhoni and her daughter Ziva arrive in Udaipur to attend the wedding of Isha Ambani and Anand Piramal. The couple will tie the knot on December 12 in the city. pic.twitter.com/CMqjxkd5zx
— ANI (@ANI) December 8, 2018
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाहसोहळा १२ डिसेंबरला मुंबईत पार पडेल. तत्पूर्वी उदयपूरमध्ये हा प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यापूर्वी अंबानी कुटुंबीयांकडून जयपूरमध्ये 'अन्न सेवा'ही सुरु करण्यात आलेय. हा सोहळा चार दिवस सुरु राहणार असून येथे जवळपास ५१०० लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेय. विशेष म्हणजे या लोकांना दिवसातून तीनवेळा जेवण देण्यात येईल. मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी शुक्रवारी स्वत:च्या हाताने लोकांना जेवण वाढले.