अगरताळा : भाजपने पुन्हा एकदा त्रिपुरामध्ये मोठा विजय मिळवला आहे. ग्रामपंचायत उपनिवडणुकीत भाजपने 130 पैकी 113 जागांवर विजय मिळवला आहे. निवडणुक आयुक्त जी के राव यांनी बुधवारी निकाल घोषित केला.
भाजपने पंचायत समितीमध्ये सात पैकी पाच जागांवर विजय मिळवला. तर भाजपचा मित्र पक्ष इंडीजीनियस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराने ग्रामपंचायत निवडणुकीत 9 जागा जिंकल्या. काँग्रेस आणि माकपाला ग्रामपंचायत निवडणुकीत चार-चार जागा मिळाल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या एकूण 132 आणि पंचायत समितीच्या 7 जागांवर उपनिवडणूक 30 सप्टेंबर 2018 रोजी झाली होती. त्रिपुरामध्ये भाजप सरकार बनल्यानंतर लेफ्ट पक्षाच्या अनेक प्रतिनिधींनी राजीनामे दिले होते. यानंतर येथे जागा खाली झाल्या होत्या.
उमेदवारीबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी गोंधळ घालत म्हटलं की, मोठ्य़ा प्रमाणात हिंसेमुळे ते उमेदवारी अर्ज दाखल करु नाही शकले. त्यामुळे त्यांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. पण निवडणूक आयोगाने हा मागणी अमान्य केली आहे.