बठिंडा : मनात जर दृढ निश्चय असेल तर कोणतीही समस्या तुम्हाला तितकी गंभीर वाटत नाही. असे व्यक्ती आयुष्यात अशक्यही शक्य करुन दाखवतात. पंजाबमधल्या 13 वर्षाच्या तरुणासोबतही असंच काहीस घडलंय. विजयला दोन्ही पाय नाहीत. लहानपणी कोणत्यातरी आजारामुळे त्याने दोन्ही पाय गमावले. असं असलं तरीही आयुष्याच्या स्पर्धेत त्याने कित्येकांना मागे टाकलंय.
Punjab: Vijay, a 13-year-old boy from Bathinda who lost both his legs to a disease when he was a toddler is all set to participate in the finale of a dance competition to be held in Ludhiana. (3/10/2018) pic.twitter.com/BeoU7MDpZo
— ANI (@ANI) October 4, 2018
लहानपणी एका ऑपरेशनदरम्यान त्याचे दोन्ही पाय कापावे लागले. एवढं असूनही तो डान्स करण्यात मातब्बर आहे. त्याला डान्सची इतकी आवड आहे की त्याची दिव्यांगता यामध्ये कधीच येत नाही. विजय सध्या एका डान्स शो स्पर्धेची तयारी करतोय.
I want to become a good dancer. Now I will participate in the finals of a dance competition to be held in Ludhiana on 7th October. My mother, friends and school teachers support me a lot. I would like to take up engineering as a profession in future: Vijay #Punjab (3/10/2018) pic.twitter.com/NrSNhlva1e
— ANI (@ANI) October 4, 2018
'मला एक खूप चांगला डान्सर बनायचंय म्हणून मी पुढच्या महिन्यात लुधियानामध्ये होणाऱ्या डान्स स्पर्धेत सहभागीत होतोय', असं तो सांगतो. मला माझी आई, शिक्षक आणि मित्रांनी खूप मदत केली. भविष्यात मला इंजिनियरींग करायचेय अशी इच्छाही तो व्यक्त करतो.