'दिल्लीत 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का'

काँग्रेसला आगामी लोकसभा निव़डणुकीत राजधानीत धक्का बसणार आहे, तर दुसरीकडे भाजपाला देखील धक्का देण्याच्या तयारीत आप आहे.

Updated: Aug 21, 2018, 02:13 PM IST
'दिल्लीत 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का' title=

नवी दिल्ली : 'दिल्लीत 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का' बसणार असल्याचं, एका सर्वेचा हवाल देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. काँग्रेसला आगामी लोकसभा निव़डणुकीत राजधानीत धक्का बसणार आहे, तर दुसरीकडे भाजपाला देखील धक्का देण्याच्या तयारीत आप आहे. आप आणि भाजपाची दिल्लीत काँटे की टक्कर होणार असल्याचं एका सर्वेत म्हटलं आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. 'आप'ची नजर दिल्लीतील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागांवर आहे. 

लढत आप आणि भाजपात

'आप'चे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी, एक ट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये केजरीवाल यांनी म्हटलं आहे की, दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भाजपा यांची सरळ सरळ लढत आहे.

काँग्रेसला देखील मोठा फटका?

अरविंद केजरीवाल यांनी एका सर्वेची बातमी ट्वीट केली आहे. केजरीवाल यांनी लिहिलं आहे की, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत फक्त ९ टक्के मतं मिळणार आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय की, आप दिल्लीच्या लोकांच्या हितात काम करतोय. 

दिल्लीतील ७ जागांवर नजर

दिल्लीच्या लोकांना वाटतं की, सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी आप लढतंय. तर काँग्रेस आणि भाजपाचे दिल्लीतील खासदार कधीच दिल्लीतील लोकांचा विचार करत नाहीत, तसेच दिल्लीचं हित लक्षात घेऊन आम आदमी पार्टीला मतदान करा, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे. दिल्लीतील सातच्या सात जागांवर आपचे खासदार राहिले असते, तर दिल्लीत सीलिंग राहिली असती, आणि मेट्रोची भाडेवाढ होवू दिली नसती.

भाजपाला दिल्लीत बसू शकतो मोठा फटका

केजरीवाल यांनी सोमवारी जे ट्वीट केलं आहे, त्यात दिल्ली सरकारच्या कामकाजात अडथळे निर्माण केल्याने दिल्लीकर भाजपवर नाराज असल्याचं म्हटलं आहे. तसेच लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला दिल्लीत मोठा फटका बसणार असल्याचं, केजरीवाल यांनी हिंदीत ट्वीट करत म्हटलं आहे.