'भाजप २०१८ मध्येच घेणार लोकसभा निवडणूक'

लोकसभा निवडणूक भाजप याच वर्षी घेऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 2, 2018, 04:27 PM IST
'भाजप २०१८ मध्येच घेणार लोकसभा निवडणूक' title=

लखनऊ : लोकसभा निवडणूक भाजप याच वर्षी घेऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.

याच वर्षी निवडणूक?

समाजवादी पक्षाने असा दावा केला आहे की, याच वर्षात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सपाने रननीती बनवायला देखील सुरुवात केली आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र?

सपाचे राष्ट्रीय सचिव राजेन्द्र चौधरी यांनी आज म्हटलं की, या वर्षाच्या शेवटी मध्य प्रदेशसह अनेक भाजप शासित राज्यांमध्ये निडवणुका होणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसोबतच लोकसभेची निवडणूक देखील भाजप सरकार घेऊ शकते.

सपाने सुरु केली तयारी

सपाने यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. पक्षाने प्रोफर्मा जारी करत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अर्ज मागवले आहेत. जे ३१ जानेवारीपर्यंत जमा करायचे आहेत. त्यांनी म्हटलं की, बूथस्तरावर पक्षाला मजबूत करण्यासाठी सपाने तयारी सुरु केली आहे. यामुळे भाजपचा पराभव करणे शक्य होईल.'