राहुल गांधींनंतर आता मायावतींचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्लबोल केलाय. 

Updated: Jan 3, 2018, 09:46 AM IST
राहुल गांधींनंतर आता मायावतींचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल title=

नवी दिल्ली : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्लबोल केलाय. 

मायावतींची टीका

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘जी घटना घडली ती रोखली जाऊ शकत होती. सरकारने तिथे सुरक्षेची योग्य व्यवस्था करायला हवी होती. तिथे भाजपची सत्ता आहे आणि त्यांनीच तिथे हिंसा घडवली आहे. यात भाजप आणि आरएसएस तसेच जातीवादी ताकदींचा हात आहे’.

राहुल गांधींची टीका

याआधी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाजप आणि आरएसएसवर आरोप केले होते. राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले होते की, ‘भारतासाठी आरएसएस आणि भाजपची हीच भूमिका आहे की, त्यांना दलितांना खालच्या स्तरावरच ठेवायचे आहे. उना, रोहित वेमुला आणि आता भीमा कोरेगाव याचे सशक्त प्रतिक आहेत’.

महाराष्ट्र बंदचे क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.