मुंबई : अखेर अडवाणी यांनी मौन सोडले आहे. भाजपने राजकीय विरोधकांना कधीच देशद्रोही ठरवलेले नाही, ब्लॉगमधून अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजचे अध्यक्ष अमित शाह यांना जोरदार टोला लगावला आहे. देशातील लोकशाही विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. भाजपच्या विचारांशी, धोरणांशी सहमत नसलेल्यांना भाजपने कधीही शत्रू, देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही. विरोधकांचा आदर करत त्यांना भिन्न विचारांचे मानले. संविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य, निष्ठा, निःपक्षपातीपणा आणि त्यांच्या कणखरतेचे संरक्षण करण्यासाठी भाजप नेहमी अग्रेसर राहिला आहे, असे भाष्य भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले आहे. त्यांनी भाजपच्य स्थापना दिनाचे औचित्य साधून ब्लॉग लिहिला आहे. त्यात त्यांनी हे भाष्य केले आहे. अडवाणी यात ब्लॉगमध्ये लिहितात, माझ्या जीवनाचे एकच तत्व आहे ते म्हणजे ‘देश प्रथम, मग पक्ष आणि नंतर मी.' प्रत्येक परिस्थितीमध्ये मी या तत्वांचे पालन केले आहे आणि पुढेही करत राहील, असेही त्यांनी नमूद केले.
मी माझ्या जीवनाचे ध्येय ठरविले आहे. यात नेहमी देश प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः आपण, असेच राहिले आहे. आज याच सिद्धांतावर आजपर्यंत वाटचाल केली आहे आणि यापुढेही हाच नियम कायम राहील. भाजपच्या विचारांशी, धोरणांशी सहमत नसलेल्यांना भाजपने कधीही शत्रू, देशद्रोही वा देशविरोधी मानत नाही. विरोधकांचा आदर करत त्यांना भिन्न विचारांचे मानले. संविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य, निष्ठा, निःपक्षपातीपणा आणि त्यांच्या कणखरतेचे संरक्षण करण्यासाठी भाजप नेहमी अग्रेसर राहिला आहे, असे अडवाणी यांनी ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. भाजपचा संस्थापक सदस्याच्या रुपामध्ये मी देशातील लोकांसोबत माझा अनुभव मांडणे माझे कर्तव्य समजतो. विशेषत: भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांसोबत. दोन्हीकडून मला स्नेह आणि सन्मान मिळाला आहे.
Veteran BJP leader LK Advani writes a blog ahead of BJP's Foundation Day on April 6. He writes "Right from its inception, BJP has never regarded those who disagree with us politically as our “enemies”, but only as our adversaries." pic.twitter.com/47zCyYCSPN
— ANI (@ANI) April 4, 2019
गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अडवाणी यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, त्यांनी गांधीनगरमधील लोकांचे आभार मानले आहे. आपल्या ब्लॉगमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी गांधीनगर येथील मतदारांचेही आभार मानले आहेत. १९९२ नंतर येथील मतदारांनी मला सहावेळी निवडून दिले त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Veteran BJP leader LK Advani writes a blog ahead of BJP's Foundation Day on April 6. He writes "Right from its inception, BJP has never regarded those who disagree with us politically as our “enemies”, but only as our adversaries." pic.twitter.com/47zCyYCSPN
— ANI (@ANI) April 4, 2019
देशसेवा करणे माझे कर्तव्य आहे. आणि ते माझ्या रक्तात आहे, त्याकडे मी एक मोहीम म्हणून मी पाहतो. आपण १४ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडला गेलो. मागील सात दशकात माझे आयुष्य भाजपशी जोडले गेले आहे. आधी भारतीय जनसंघ, त्यानंतर भाजपचा संस्थापक सदस्य या आणि अशा अनेक जबाबदाऱ्या मी स्वीकारल्या आहेत. पंडित दिनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आणि इतर यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. निवडणुका या लोकशाहीचा उत्सव आहेत. त्या योग्य पद्धतीने आणि निष्पक्षपातीपणाने झाल्या पाहिजेत, मत त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये मांडले आहे.