Video : खासदाराने सरकारी कर्मचाऱ्याला लगावली कानशिलात; शेतकऱ्यांकडून वसुलीचा आरोप

खासदाराने कर्मचाऱ्याला बोलावून घेतले आणि सर्वांसमोर कानाखाली लगावली

Updated: Nov 3, 2022, 02:52 PM IST
Video : खासदाराने सरकारी कर्मचाऱ्याला लगावली कानशिलात; शेतकऱ्यांकडून वसुलीचा आरोप title=

राजस्थानमध्ये (rajasthan) आता भाजपच्या (BJP) एका खासदाराचा सरकारी कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भाजप खासदार एका कर्मचाऱ्याला उघडपणे कानाखाली मारताना दिसत आहेत. चित्तोडगडचे भाजप खासदार सीपी जोशी (CP Joshi) यांनी एका कर्मचाऱ्याला मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कर्मचाऱ्यावर अफूचा (afim) परवान्याचे वाटप करताना शेतकऱ्यांकडून (Farmer) वसुली केल्याचा आरोप आहे. त्यावर भाजप (BJP) खासदार इतके संतापले की त्यांनी या कर्मचाऱ्याला जोरदार कानाखाली मारली. मंगळवारी सायंकाळी प्रतापगड जिल्हा अफू कार्यालयात ही घटना घडली आहे.

खासदार जोशी यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याने केलेल्या कथित वसुलीबाबत बोलण्यास सुरुवात केली आणि अचानक त्याला चापट मारली. यावेळी अनेक पोलीस व प्रशासकीय कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते. अफू पट्ट्यांतील कार्यालयात हस्तांतरण परवाना वाटप करताना वसुलीची तक्रार खासदार सीपी जोशी यांच्याकडे काही शेतकऱ्यांनी केली होती. तक्रार मिळाल्यानंतर सीपी जोशी यांनी कार्यालय गाठले. कार्यालय अधिकारी, शेतकरी आणि समर्थकांनी भरले होते. 

वसुलीवर बोलत असताना खासदार सीपी जोशी यांनी पैसे घेतल्याचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्याला फोन केला. रोजंदारीवर काम करणारा भंवर सिंग हा कर्मचारी तेथे आला असता, त्याला किती पैसे घेतात असे विचारले असता त्याने पाच हजार रुपये सांगितले. हे ऐकून खासदार भडकले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला जोरदार कानाखाली मारली. यादरम्यान कोणीतरी व्हिडिओ बनवून व्हायरल केला. यावेळी खासदारांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडसावले. आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

दरम्यान, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या खासदार सी.पी.जोशी हे कोणत्यातरी शिबिरात आहेत. याप्रकरणी त्यांनी शिबिरातून बोलू अशी प्रतिक्रिया दिली आहे.