मर्सल चित्रपटातून 'ती' दृश्य काढून टाकण्याची भाजपाची मागणी

मर्सल या तामिळ चित्रपटावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

Updated: Oct 22, 2017, 11:05 PM IST
मर्सल चित्रपटातून 'ती' दृश्य काढून टाकण्याची भाजपाची मागणी title=

नवी दिल्ली : मर्सल या तामिळ चित्रपटावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

मर्सल चित्रपटात मोदी सरकारच्या जीएसटी कररचना तसंच डिजिटल इंडिया या दोन महत्त्वाच्या निर्णयांवर टीका करण्यात आली आहे.

भाजपनं मर्सल चित्रपटातून ती संबंधित दृश्यं काढण्याची मागणी केली आहे.

दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या चित्रपटाला समर्थन दर्शवत, भाजपच्या भूमिकेचा निषेध केला आहे. तर विविध थरांतूनही या प्रकरणी भाजपविरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत.