व्हिडिओ : RTI कार्यकर्त्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला

हरियाणाच्या जींदमध्ये आरटीआय कार्यकर्ते सुनील कपूर यांच्यावर काही अज्ञातांनी त्यांच्याच घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. न्यूज एजन्सी एएनआयनं या घटनेचा व्हिडिओ जाहीर केलाय. या व्हिडिओत हत्यारासहीत काही व्यक्ती सुनील कपूर यांच्या घरात जबरस्तीनं घुसताना दिसत आहेत... तसंच कपूर यांच्यावर हल्ला करतानाचा प्रसंगही कॅमेऱ्यात कैद झालाय. 

Updated: Mar 28, 2018, 11:15 AM IST
व्हिडिओ : RTI कार्यकर्त्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला  title=

नवी दिल्ली : हरियाणाच्या जींदमध्ये आरटीआय कार्यकर्ते सुनील कपूर यांच्यावर काही अज्ञातांनी त्यांच्याच घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. न्यूज एजन्सी एएनआयनं या घटनेचा व्हिडिओ जाहीर केलाय. या व्हिडिओत हत्यारासहीत काही व्यक्ती सुनील कपूर यांच्या घरात जबरस्तीनं घुसताना दिसत आहेत... तसंच कपूर यांच्यावर हल्ला करतानाचा प्रसंगही कॅमेऱ्यात कैद झालाय. 

या हल्ल्यात सुनील कपूर आणि त्यांच्या मुलांना गंभीर दुखापत झालीय. हा संपूर्ण घटनाक्रम सुनील कपूर यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. 

हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी कशासाठी हा हल्ला केला होता, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. कारण, यावेळी हल्लेखरोरांनी आपला चेहरा कपड्यानं झाकलेला होता... त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. 

पोलिसांच्या माहितीनुसार, जींदच्या बाजार भागात सुनील कपूर आणि त्यांचं कुटुंब राहतं. मंगळवारी रात्री जवळपास १० वाजल्याच्या सुमारास काही चेहरा झाकलेल्या हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्लेखोरांकडे असलेल्या बंदुकीनं त्यानी कपूर यांच्या घरावर गोळीबारही केला. परंतु, सुदैवानं या हल्ल्यात कुटुंबातील कुणालाही गंभीम झालेली नाही... परंतु, त्यानंतर हल्लेखारांनी काठीनं केलेल्या मारहाणीत सुनील कपूर आणि त्यांच्या आईला जखमा झाल्यात.

पोलिसांत अज्ञातांविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केलाय. सुनील, त्यांचा मोठा भाऊ संजय कुमार, वडील ओमप्रकाश आणि आई मीना कपूर घरात टीव्ही पाहत असताना हा हल्ला झाल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आलाय.