750000000000 इतक्या कोटीचा झाला अदानी यांच्या संपत्तीचा चुराडा, वाचा काय झालं

Billionaires List: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदाणी दहाव्या क्रमांकावर गेले आणि आता थेट पंधराव्या क्रमांकावर घसरण झाले.

Updated: Feb 2, 2023, 04:27 PM IST
750000000000 इतक्या कोटीचा झाला अदानी यांच्या संपत्तीचा चुराडा, वाचा काय झालं title=

Billionaires List: देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) वर्ष 2023-2024 बजेट सादर करत होत्या आणि तिकडे जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मोठा उलटफेर होत होता. अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) अदानी समूहावर (Adani Group ) लावलेल्या फसवणुकीच्या आरोपानंतर भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना मोठा धक्का बसला आहे. या रिपोर्टनंतर अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली. काही दिवसांपूर्वी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी थेट पंधराव्या क्रमांकावर घसरले आहेत. 

अदानींच्या साम्राज्यात त्सुनामी
अवघ्या एका आठवड्यात गौतम अदानी यांच्या साम्राज्यात (Gautam Adani Fortune) त्सुनामी आली आहे. Hindenburg रिसर्चने 24 जानेवारीला अदानी समूहाशी संबंधीत अहवाल प्रसिद्ध केला होता. ज्यात अदानी समुहाने घेतलेल्या कर्जाबाबत धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. या अहवालाचा Adani Group च्या गुंतवणूकदारांवर मोठा परिणाम झाला आणि कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. ही घसरण अजून कायम आहे. 

अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट
अदानी समूहाचे शेअर्स आपटल्याचा थेट परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीवर (Gautam Adani Net Worth) झाला आहे. दररोज त्यांच्या संपत्तीत दररोज कोटींनी घट होत आहे. मंगळवारी गौतम अदानी Top-10 Billionaires च्या यादीतून बाहेर पडले. आणि आता तर ते थेट पंधराव्या क्रमांकावर घसरले आहेत. फोर्ब्सच्या रियल टाइम बिलेनियर्स इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 750000000000 कोटी रुपयांची घट झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती 75.1 अरब डॉलर इतकी झाली आहे. 

श्रीमंतांच्या यादीत होते दुसऱ्या स्थानावर
गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये गौतम अदानी सर्वाधिक कमाई करणारे अरबपती होते आणि जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप-10 मध्ये ते दुसऱ्या क्रमांकार होते. पण नवीन वर्ष म्हणजे 2023 सुरु झालं आणि गौतम अदानी यांच्या साम्राज्यला हादरा बसला. जेफ बेजोस यांनी त्यांना मागे ढकललं आणि अदानी चौथ्या क्रमांकावर घसरले. त्यातच हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि यादीत गौतम अदानी यांची घसरण सुरु झाली. 

स्टॉक मार्केटमध्ये घसरण
Stock Market मध्ये लिस्टेड असलेल्या अदानी समूहाच्या सात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसात स्टॉक मार्केटमध्ये अदानी समुहाला 7 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. Adani Total Gas आणि Adani Green Energy च्या शेअरमध्ये गेल्या पाच दिवसात सर्वाधिक 20 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय Adani Ports ते Adani Wilmar या कंपनींच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहिला मिळतंय. 

बजेटच्या दिवशी अदानीचे शेअर घसरले
ऐन Budget 2023 च्या दिवशी शेअर बाजारात गौतम अदानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. Adani Enterprises Ltd च्या शेअरची मोठी पडझड झाली. कंपनीचे स्टॉक 794.15 रुपये घसरणीवरुन  2,179.75 रुपयांवर बंद झाले. याशिवाय  Adani Total Gas, Adani Green Energy Ltd आणि Adani Power या कंपनीचे शेअरही पडले.

अदनी समुहाने एफपीओ मागे घेतला
अदानी एंटरप्रायझेसने आपला 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ शेअर मार्केटमधून काढून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन शॉर्टसेलिंग कंपनी हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर अदानी एंटरप्रायझेसने हे पाऊल उचलले आहे. BSC डेटानुसार, अदानी एंटरप्रायझेसच्या FPO अंतर्गत 4.55 कोटी शेअर्स ऑफर करण्यात आले होते, तर 4.62 कोटी शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाले होते.

टॉप-10मध्ये मुकेश अंबानी कायम
श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून गौतम अदानी टीप10 मधून बाहेर पडले असले तरी भारतीचे दुसरे श्रीमंत उद्योगपती रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी या यादीत आपलं स्थान टिकवून आहेत. मुकेश अंबानी 83.7 अरब डॉलरच्या संपत्तीसह जगातील नववने सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.