राजकारण तापणार, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस उमेदवाराचे बिकिनीत फोटो व्हायरल, दिलं असं प्रत्युत्तर

राजकारण तापणार...  

Updated: Jan 15, 2022, 09:31 AM IST
राजकारण तापणार, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस उमेदवाराचे बिकिनीत फोटो व्हायरल, दिलं असं प्रत्युत्तर title=

मेरठ : उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणूक 2022 मुळे (UP Assembly Election 2022) वातावरण तापलं आहे. विजय मिळवण्यासाठी सर्व उमेदवार प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अर्चना गौतम यांचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर अर्चना गौतम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसच्या उमेदवार अर्चना गौतम यांनी सांगितलं की, 'मी मिस बिकिनी 2018 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. मी मिस उत्तर प्रदेश 2014 आणि मिस कॉस्मो वर्ल्ड 2018 राहिली आहे. मी लोकांना आवाहन करतो की, माझा प्रोफेशन आणि राजकीय करियरला एकत्र करू नका.'

सांगायचं झालं तर, 13 जानेवारी रोजी काँग्रेसने यूपी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. यामध्ये अर्चना गौतम यांना हस्तिनापूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत 125 उमेदवारांची नावे आहेत. 125 उमेदवारांमध्ये 40 टक्के महिला आणि 40 टक्के तरुण आहेत.