बिहारमधील (Bihar) एका वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्याचा एक सध्या व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. एका प्रश्नाला दिलेल्या अजब उत्तरामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात एका शाळकरी मुलीने सरकार 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड (Free Sanitary Pads) देऊ शकत नाही का? असा प्रश्न विचारला होता. यावर वरिष्ठ महिला आयएएस (IAS) अधिकाऱ्याने दिलेलं उत्तर ऐकून सर्वांनाच धक्का बसला. (bihar IAS Officer Strange Reply to Student Asking for Free Sanitary Pads)
महिला आणि बाल विकास महामंडळ, युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लॅन इंटरनॅशनल यांनी 'सशक्त बेटी, समृद्धी बिहार: टुवर्ड्स एन्हान्सिंग द वॅल्यू ऑफ गर्ल चाइल्ड' या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत एका मुलीने विचारले की सरकार 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड (Sanitary Pads) मोफत देऊ शकत नाही का? यावर महिला व बाल विकास महामंडळाच्या अध्यक्षा-सह-व्यवस्थापकीय संचालक हरजोत कौर बमरा (women development corporation md harjot kaur) यांनी वादग्रस्त उत्तर दिले.
यावर आयएएस अधिकारी हरजोत कौर यांनी उत्तर देताना म्हटलं की “या मागण्यांना काही शेवट आहे का? उद्या तुम्ही म्हणाल सरकार जीन्स, सुंदर शूज देईल का? शेवटी जेव्हा कुटुंब नियोजनाची वेळ येईल तेव्हा तुम्हा सर्वांना मोफत कंडोमही (condoms) लागेल.”
हरजोत कौर (harjot kaur) यांच्या उत्तराला प्रत्युत्तर देताना विद्यार्थ्यीनीने म्हटलं की, "जनतेच्या मताने सरकार बनते. यावर हरजोत कौर म्हणाल्या की, हा मूर्खपणा आहे. मतदान करू नका पाकिस्तानात (pakistan) जा."
पाकिस्तानबाबतच्या वक्तव्यावर विद्यार्थ्यानीने, मी भारतीय आहे असे सांगितले. मी पाकिस्तानात का जाऊ? असा सवाल केला. यावर हरजोत कौर म्हणाल्या की, तुम्ही पैसे आणि सेवांसाठी मत देता का?
दरम्यान, वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हरजोत कौर यांच्या उत्तराने सगळेच हैराण झाले आहेत.