सुssसाट वेगानं जाणाऱ्या कारचं नियंत्रण सुटलं आणि..... पाहा भीषण अपघाताचा थरारक व्हिडीओ

हलक्या मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नका! कार अपघाताचा थरारक व्हिडीओ

Updated: May 11, 2022, 05:17 PM IST
सुssसाट वेगानं जाणाऱ्या कारचं नियंत्रण सुटलं आणि..... पाहा भीषण अपघाताचा थरारक व्हिडीओ title=

गोपाळगंज : वेगानं येणाऱ्या गाडीचं नियंत्रण सुटलं आणि घात झाला. गाडी थेट रस्ता सोडून दुसरीकडेच गेली. काळ आणि वेग एकदमच आली आणि रस्त्यातच गाठलं. भरधाव कारचं नियंत्रण सुटल्याने कार अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. 

भीषण कार अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अपघाता कार चालकाचं काय झालं याची अजून माहिती मिळाली नाही. मात्र जवळ उभा असलेला तरुण थोडक्यात वाचला. 

बिहारच्या गोपाळगंज भागात हा धक्कादायक प्रकार घडला. गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कार थेट रस्ता सोडून विटांना धडक मारून पुढे गेली. 

 

कारचा वेग एवढा होता की विटांमधून जाऊन पुढे उभ्या असलेल्या दुचाकीला धडकली. ही धक्कादायक घटना भोरे थाना परिसरातील आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.