मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर प्रचार सभेत कांदे फेकले

कांदा निर्यातबंदीचा मुद्दा बिहार निवडणुकीतही गाजत आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर थेट प्रचार सभेतच एकानं कांदे आणि दगड फेकून मारले.  

Updated: Nov 3, 2020, 10:48 PM IST
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर प्रचार सभेत कांदे फेकले  title=
संग्रहित छाया

पाटणा : कांदा निर्यातबंदीचा मुद्दा बिहार निवडणुकीतही गाजत आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर थेट प्रचार सभेतच एकानं कांदे आणि दगड फेकून मारले. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मधुबनी जिल्ह्यात नितीश कुमारांची प्रचार सभा होती. यावेळी हा प्रकार घडला. अखेर नितीश कुमार यांच्यासमोर सुरक्षा रक्षक उभा राहिला. त्यानंतर पुढे त्यांचे भाषण सुरु राहिले.

हरलाखी गावातल्या सरकारी शाळेत सुरू असलेल्या प्रचार सभेत नितीश कुमार भाषणाला उभे राहिले. जेव्हा त्यांनी राज्यातल्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलायला सुरुवात केली तसे एकाने नितीश कुमारांवर कांदे आणि दगड फेकालया सुरुवात केली. पोलिसांनी त्याला पकडले. पण सभेतही त्याने दारुविक्रीला सऱ्हास परवानगी दिली जाते. मात्र, इतर बाबींवर निर्बंध असल्याच्या घोषणा दिल्या. 

नितीश कुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. यावेळी नितीश यांनी तेजस्वी यादव, लालू यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यावर टीका केली. आरजेडीकडे १५ वर्ष सत्ता होती. त्यावेळी काय केले. ते १० लाख सरकारी नोकऱ्या कशा देणार असा प्रश्न केला. दरम्यान, नितीश कुमार यांच्या सरकार विरोधात मतप्रवाह दिसून येत आहे. त्यांना ही निवडणूक जड जाण्याचे संकेत मिळत आहेत. तर अनेक मंत्र्यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागले आहे. खुद्द नितीश कुमार यांच्या सभेत कांदा फेक झाल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे.