बिहार विधानसभा निवडणूक: NDA मधून LJP बाहेर पडणार?

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या बैठकींच्या फेऱ्या सुरू आहेत.

Updated: Oct 2, 2020, 09:29 PM IST
बिहार विधानसभा निवडणूक: NDA मधून LJP बाहेर पडणार?  title=

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या बैठकींच्या फेऱ्या सुरू आहेत. एनडीए आणि महाआघाडी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अजूनही सूटलेला नाही. एलजेपीच्या नाराजीमुळे एनडीएतील जागा वाटपाचं सूत्र अडलं आहे. चिराग पासवान यांना जास्त जागा हव्या आहेत. शनिवारी एलजेपीची बैठक होणार आहे. निवडणुकीपूर्वी एलजेपीची ही शेवटची बैठक असेल.

या बैठकीत सर्व 143 उमेदवारांवर चर्चा होईल. म्हणजेच, एलजेपी 143 जागांवर उमेदवार उभे करू पाहत आहे. अशा परिस्थितीत ती एनडीएपासून विभक्त झाली तरी आश्चर्य वाटायला नको. आज एलजेपीने नितीश सरकारवर टीका केली आहे. पक्षाने म्हटले आहे की, नितीश सरकारचा सात-निश्चयांचा अजेंडा भ्रष्टाचाराची पेटी आहे. बिहार सरकारच्या अजेंडा कार्यक्रम एलजेपीला मान्य नाही.

जेडीयू-भाजप-एलजेपी यांच्यात जागा वाटपाचा तिढा कायम आहे. बिहारच्या राजकीय परिस्थितीमुळे एनडीएतील तीन पक्ष एकमेकांना सोडण्याचे धाडस करण्यासही सक्षम नाहीत. त्यांना कोणता मार्गही सापडत नाहीये.

चिराग पासवान यांना सोबत घेण्याची भाजपची इच्छा आहे. हाथरस प्रकरणानंतर विरोधी पक्ष भाजपवर जोरदार टीका करत आहे. त्यामुळे भाजपला एलजीपीची साथ सोडणं कठीण होणार आहे.

भाजपने एलजेपीला 36 जागा आणि दोन एमएलसी जागा देण्याची ऑफर दिली. निवडणुकीनंतर अशी परिस्थिती उद्भवली की भाजप आणि एलजेपी एकत्र सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असेल तर ते नितीश कुमारांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे भाजपला एलजेपीची साथ सोडायची नाहीये.