भारताच्या कुटनीतीला यश, चीन पडला तोंडावर, पाकिस्तानची कोंडी

दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला जगासमोर पुन्हा एकदा तोंडघशी पडावे लागले आहे. भारताची कुटनीती यशस्वी ठरली असून, पाकची पुरती कोंडी झाली आहे. तर, पाकला पाठींबा देणारा चीनही एकटा पडला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 5, 2017, 11:20 PM IST
भारताच्या कुटनीतीला यश, चीन पडला तोंडावर,  पाकिस्तानची कोंडी title=

इस्लामाबाद: दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला जगासमोर पुन्हा एकदा तोंडघशी पडावे लागले आहे. भारताची कुटनीती यशस्वी ठरली असून, पाकची पुरती कोंडी झाली आहे. तर, पाकला पाठींबा देणारा चीनही एकटा पडला आहे.

भारताच्या कुटनीतीतीचा विजय असा की, फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला दहशतवाद्यांना केल्या जाणाऱ्या आर्थिक पुरवठ्याचा अहवाल मागितला आहे. एफएटीएफही एक जागतीक संस्था असून, ती जगभरातील दहशतवाद, ड्रग्ज, तस्करी, हवाला आदी गोष्टींवर बारीक लक्ष ठेऊन असते. एफएटीएफच्या या कारवाईमुळे पाकिस्तानच्या कारवायांना अंधळेपणाने पाठिंबा देणारा चीनही आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडला आहे.

आर्जेटींना येथे नुकत्याच पार पडलेल्या एफएटीएफच्या एकदिवसीय परिषदेत पाकबाबतचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत भारताना दहशतवाद्यांना केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा मुद्दा उचलत पाकिस्तानवर काय कारवाई करणार असा सवाल उपस्थीत केला होता. यावर एफएटीएफने हा मुद्दा गांभीर्याने घेत पाकिस्तानला ३ महिन्यांसाठी निरिक्षणाखाली ठेवण्याच्या यादीत टाकले. तसेच, फेब्रुवारी २०१८ पर्यंत दहशदवाद्यांना केलेल्या मदतीसंबंधी माहिती अहवाल देण्याबाबतचे आदेश दिले.

एफएटीएफच्या या आदेशामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच, दहशतवादाच्या मुद्दयावर मोठा विजय झाला आहे. भारताची ही कुटनीती कामी आली असून, यामुळे पाकिस्तानला थेट दणका बसला आहे. तर, चीनलाही एकाकी पडावे लागले आहे.