मध्यमवर्गीयांना मोठा झटका : LPG सिलिंडरच्या किंमती वाढल्या, हे आहेत नवे दर

 घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी वाढ 

Updated: Feb 4, 2021, 10:42 AM IST
मध्यमवर्गीयांना मोठा झटका : LPG सिलिंडरच्या किंमती वाढल्या, हे आहेत नवे दर  title=

नवी दिल्ली : सर्वसामान्यांना महागाईने मोठा झटका दिलाय. घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. तेल कंपन्यांनी LPG सिलिंडरच्या किंमती जाहीर केल्यायत. हे दर प्रति सिलिंडर 25 रुपयांनी वाढवण्यात आलेयत. व्यावसायिक सिलेंडरचे दर सहा रुपयांनी वाढवण्यात आलेयत. याआधी कमर्शिअल एलपीजी सिलेंडर (19 kg) चे दर 190 रुपये प्रति सिलिंडर वाढवण्यात आलेयत.

आता सिलिंडरच्या किंमती किती ?

घरगुती गॅस (LPG Cylinders)च्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाल्यानंतर दिल्लीत एलपीजीची किंमत 719 रुपये झालीय. आजपासून म्हणजेच 4 फेब्रुवारीपासून हे दर लागू झालेयत. डिसेंबरमध्ये IOC ने घरगुती गॅसच्या किंमती दोनवेळा वाढवल्या. कंपनीने 2 डिसेंबरला 50 रुपयांनी वाढ केली. त्यानंतर 15 डिसेंबरला 50 रुपये आणखी वाढवले.

190 रुपयांनी वाढल्या किंमती 

याआधी 1 फेब्रुवारीला कमर्शिअल एलपीजी (19kg) चे दर 190 रुपयांनी वाढले. ज्यामध्ये आतापर्यंत 6 रुपयांची कपात झालीय. मुंबईत कमर्शिअल सिलिंडरची किंमत 1482.50 रुपये आहे.

असे पाहा तुमच्या शहरातील दर 

तुम्ही काही मिनिटात तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरचे दर तपासू शकता. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती तपासू शकता. यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपन्यांच्या वेबसाईटवर जावे लागेल. इथे कंपन्या नवे दर जाहीर करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही शहरातील गॅस सिलिंडरचे दर तपासू शकता.