नवी दिल्ली : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनातल्या हिंसाचारासानंतर व्ही. एम.सिंग यांच्या शेतकरी संघटनेनं आंदोलनातून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. भारतीय किसान युनियन म्हणजे भानू या संघटनेचे व्ही. एम. सिंग प्रमुख आहेत. भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला. हे अतिशय क्लेषदायक असल्याचंही व्ही.एम. सिंग यांनी म्हटलं आहे. हे आंदोलन हाताळण्यात सरकारनंही चूक केल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे.
व्ही एम सिंग यांनी शेतकरी आंदोनातून माघार घेतल्यानंतर आता आंदोलनात फूट पडली आहे. सिंग यांच्यासह 2 संघटनांची माघार घेत असल्याचं म्हटलं आहे.
#WATCH: Some farmers seen taking off their tents at Chilla border following announcement of Thakur Bhanu Pratap Singh, president of Bharatiya Kisan Union (Bhanu), that the organisation is ending the protest in the light of violence during farmers' tractor rally y'day.#FarmLaws pic.twitter.com/wgDIeKnUMf
— ANI UP (@ANINewsUP) January 27, 2021
२६ जानेवारी रोजी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड येथे झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर शेतकरी संघटनांमध्ये आता मोठी फूट पडली आहे. बुधवारी, गाझीपूर सीमेवरील तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करणारे व्हीएम सिंग (राष्ट्रीय शेतकरी चळवळ संघटनेचे प्रमुख) यांनी घटनेचा निषेध करत आंदोलनातून माघाराची घोषणा केली. दिल्ली आणि नोएडा येथे सीमेवर धरणे आंदोलन करणाऱ्या भानू गटानेही आता माघार घेतली आहे.
I am deeply pained by whatever happened in Delhi yesterday and ending our 58-day protest: Thakur Bhanu Pratap Singh, president of Bharatiya Kisan Union (Bhanu) at Chilla border pic.twitter.com/5WNdxM9Iqo
— ANI UP (@ANINewsUP) January 27, 2021
कालचा प्रजासत्ताक दिन हा अनेक अर्थांनी वेगळा होता. कारण एकीकडे दिल्लीतल्या राजपथावर प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि दिल्लीच्या सीमांवर असलेले हजारो आंदोलक शेतकरी ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्लीत शिरले. तिथून सुरू झाला राडा. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ले केले, अश्रूधुराचा मारा केला, तर काही आंदोलकांनी थेट ट्रॅक्टर पोलिसांवर चढवण्याचा प्रयत्न केला.
Correction: I can't carry forward protest with someone whose direction is different. I wish them best but VM Singh & Rashtriya Kisan Mazdoor Sangathan* are withdrawing from the protest: VM Singh, Rashtriya Kisan Mazdoor Sangathan & All India Kisan Sangharsh Coordination Committee pic.twitter.com/kXC70UvRWZ
— ANI (@ANI) January 27, 2021
काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावरच धावा केला. तिथं निशाण साहीबचा झेंडा फडकवला. दिवसभर धुमश्चक्री सुरु होती. यामुळं कालचा गणतंत्र दिवस होता की रणतंत्र दिवस असा प्रश्न पडला. पण मुळात मागच्या 62 दिवसांपासून शांततेत शिस्तबद्ध आंदोलन करणारे आंदोलक शेतकरी काल हिंसक का झाले, की हिंसा करणारे आंदोलक हे शेतकरीच नव्हते? सुरुवातीला शेतकऱ्यांवर लावलेला खलिस्तानीचा टॅग खरा करण्यासाठी काल कुणी प्रयत्न केले का, कालच्या आंदोलनानं 62 दिवसांच्या आंदोलकांच्या मेहनतीवर पाणी फेरलं का? कालच्या हिंसेनंतर आता शेतकरी संघटनांच्या प्रतिमेला फटका बसलाय का, की केंद्र सरकार ही परिस्थिती हातळण्यात कमी पडलं ? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.