Big Breaking : UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार; तपास CBI कडे

 केंद्र सरकारने 18 जून रोजी झालेली UGC-NET परीक्षा रद्द केलीय.. 18 जून रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे..

वनिता कांबळे | Updated: Jun 19, 2024, 11:11 PM IST
Big Breaking : UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार; तपास CBI कडे title=

NTA cancels UGC-NET Exam : NEET पाठोपाठ आता UGC-NET परीक्षा देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. UGC-NET परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला आहे. यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने (यूजीसी)  राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात यूजीसी नेट परीक्षा घेण्यात येते. पीएचडी प्रवेश, ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजेच JRF आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी  देशभरातील विद्यापीठांमध्ये UGC NET परीक्षा घेतली जाते.

18 जून रोजी ही परीक्षा झाली.   जून आणि डिसेंबर अशा दोन सत्रांमध्ये ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’तर्फे यूजीसी-नेट परीक्षा घेतली जाते. आतापर्यंत ही परीक्षा संगणकावर आधारित (कॉम्प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) घेतली जात होती. यंदा मात्र, ओएमआर म्हणजेच पेन-पेपर पद्धतीने परिक्षा घेण्यात आली. सर्व विषयांवर आणि सर्व केंद्रांवर एकाच दिवशी परीक्षा घेता याव्यात यासाठी हा बदल करण्यात आला. यावेळी यूजीसी नेटच्या 83 विषयांची परीक्षा एकाच दिवशी दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6 अशी होती.

विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट ॲनालिसिस युनिटकडून UGC-NET परीक्षेत गैरप्रकार झाल्याची माहिती मिळाली आहे. परीक्षा पारदर्शकपणे झाली की नाही याचा तपास CBI करणार आहे.  शिक्षण मंत्रालयाने UGC-NET जून 2024 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील 317 शहरांमधील 1205 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती ज्यामध्ये 11,21,225 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. 

NEET परीक्षेत मोठा गोंधळ

 नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 4 जून रोजी NEET UG-2024 परीक्षेचा निकाल जाहीर केला होता.   नीट परिक्षेचा निकाल लागल्यानंतर देशभऱात एकच खळबळ उडालीय. कारण नीटच्या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणाऱ्या या परिक्षेत  यावर्षी तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेत. तर बहुतांश विद्यार्थी एकाच केंद्रावरील असल्याचंही समोर आल्याने घोटाळ्याच्या शंकेला मोठा वाव मिळतोय. 2250 विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त गुण आहेत.   NEET परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी निकालात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार व अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे.