Congress: काँग्रेसला मोठा झटका, या 2 दिग्गज नेत्यांनी सोडला पक्ष

राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्षाला मोठा झटका लागला आहे. 

Updated: Aug 29, 2022, 02:35 PM IST
Congress: काँग्रेसला मोठा झटका, या 2 दिग्गज नेत्यांनी सोडला पक्ष title=

Congress Crisis: काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीआधीच काँग्रेसला (Congress) 2 मोठे झटके लागले आहेत. काँग्रेसच्या 2 मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. पहिलं मोठं नाव आहे ते काँग्रेसचे जम्मू-काश्मीरमधील नेते गुलाम नबी आझाद यांचं. तर त्यांच्यानंतर वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री ताज मोहिउद्दीन यांनी देखील काँग्रेसला रामराम केला आहे. ते आता गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांच्या नेतृत्वातील गटात सहभागी झाले आहेत. 

मोहिउद्दीन यांनी स्पष्ट केलं की, आझाद यांच्या नेतृत्वातील गट भारतीय जनता पक्षात (BJP) जाणार नाही. पण नॅशनल काँफ्रेंस किंवा पीडीपी सोबत युती करु शकतात.

मोहिउद्दीन यांनी म्हटलं की, आझाद नीत पक्षाचा भाजप सोबत कोणताही संबंध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांचं संबंध हे राजकीय नसून वैयक्तिक आहेत.

वरिष्ठ नेता गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. त्यांनी म्हटलं की, 'पक्ष सोडण्यासाठी त्यांना मजबूर करण्यात आलं. घरातल्या व्यक्तींनीच घर सोडण्यासाठी मजबूर केलं.'

आझाद यांनी यावेळी काँग्रेसवर टीका देखील केली. ते म्हणाले की, 'चापलुसी करण्यांना पक्षात मोठी पद देण्यात आली.'