आई शप्पथ! भंगारवाल्यानं विकत घेतले 3 हेलिकॉप्टर

आतापर्यंत भंगार वाल्याने सायकल, दुचाकी किंवा कार घेतल्याचं ऐकलं असेल पण हेलिकॉप्टर घेतल्याचं कधी ऐकलं आहे का? 

Updated: Jun 23, 2021, 03:39 PM IST
आई शप्पथ! भंगारवाल्यानं विकत घेतले 3 हेलिकॉप्टर title=

मुंबई: आतापर्यंत भंगार वाल्याने सायकल, दुचाकी किंवा कार घेतल्याचं ऐकलं असेल पण हेलिकॉप्टर घेतल्याचं कधी ऐकलं आहे का? असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. एका भंगारवाल्याने 3 हेलिकॉप्टर खरेदी केले. हे ऐकून एक क्षण विश्वास बसणार नाही मात्र हे घडलंय. हा संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी लोकांनी गर्दीही केली.

मानसा इथे एका भंगारवाल्याने  भारतीय सेन्यदलाचे हेलिकॉप्टर खरेदी केले. हे हेलिकॉप्टर रस्त्यावरून घेऊन जात असताना ते पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली होती. भंगारवाल्याच्या दुकानाबाहेर देखील मोठ्या रांगा लागल्या होत्या. 

मिळालेल्या माहितीनुसार एका हेलिकॉप्टरचं वजन साधारण 10 प्रति टन असणार आहे. भंगारातील हे  6 कंडम हेलिकॉप्टर मुंबईच्या एका व्यक्तीनं खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे. तर 2 हेलिकॉप्टर्स लुधियानाच्या एका हॉटेल मालकानं खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे. तर 3 हेलिकॉप्टर मानसा इथल्या भंगारवाल्यानं खरेदी केले आहेत. 

पंजाबच्या  मिट्ठू कबाडिया नावाच्या भंगारवाल्याकडे हे हेलिकॉप्टर्स पोहोचल्याची माहिती मिळताच लोकांनी पाहण्याची मोठी गर्दी केली. लोकांनी या हेलिकॉप्टर्सचे फोटो देखील काढले आहेत. हा सर्व प्रकार पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. मिट्ठू कबाडिया नावाच्या या भंगारवाल्याने हे हेलिकॉप्टर विकत घेतल्यानं त्याची जगभरात चर्चा आहे.

Tags: