दीर आणि सून जोमात, सासूबाई मात्र..., व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

भरमंडपात फक्त आणि फक्त दीर आणि वहिनीची चर्चा, त्यांनी असं काय केलं ज्यामुळे नातेवाईकही पाहातचं राहिले  

Updated: Aug 13, 2022, 03:31 PM IST
दीर आणि सून जोमात, सासूबाई मात्र..., व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क   title=

मुंबई : लग्न म्हटलं तर डान्स हवाचं. डान्सशिवाय प्रत्येक लग्न अपूर राहत असं म्हणायला हरकत नाही. सध्या लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे लग्नात डान्स नसेल, तर त्या लग्नाला काही धमाल नसते. लग्नात वऱ्हाडी तुफान डान्स करतात. शिवाय वधू-वराच्या डान्सकडे देखील पाहुण्यांचं लक्ष असते. पण आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये वधू-वर नाही, तर वहिनी चक्क दीरासोबत थिरकताना दिसत आहे. 

दीर आणि वहिनीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दीराच्या लग्नात वहिनीने 'लो चली मैं देवर की बरात लेके...' गाण्यावर जोरदार ठेका धरला आहे. वहिनीला डान्स करताना फक्त सासूच नाही तर नातेवाईकही त्यांच्याकडे पाहातचं राहिले. पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. पण दीर आणि वहिनींच्या व्हिडीओंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. दिवसाला एकतरी व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनी जबरदस्त डान्स करताना दिसतात.

सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.