डान्स करण्यासाठी महिलेचं असं कृत्य, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कं व्हाल!

 लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे डान्सचे आहेत, तर काही वधू-वरांच्या सुंदर क्षणांचे व्हिडीओ असतात. लग्नात फार मजा-मस्ती असते, ज्यामुळे लोकांना हे व्हिडीओ पाहाणं आवडतात.

Updated: Jul 4, 2022, 08:46 PM IST
डान्स करण्यासाठी महिलेचं असं कृत्य, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कं व्हाल! title=

मुंबई : लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे डान्सचे आहेत, तर काही वधू-वरांच्या सुंदर क्षणांचे व्हिडीओ असतात. लग्नात फार मजा-मस्ती असते, ज्यामुळे लोकांना हे व्हिडीओ पाहाणं आवडतात. लग्नाच्या मिरवणुकीतील डान्सचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. यातील काही जबरदस्त डान्सचे व्हिडीओ असतात, तर काही व्हिडीओ असे असतात जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सला हसायला आणि आश्चर्यचकित व्हायला भाग पाडत आहे.

या व्हिडीओमध्ये लग्नासारखे वातावरण पाहायला मिळते. प्रत्येकजण नाचण्यात हरवून जातो. पण त्यात निळ्या रंगाची साडी नेसलेली एक महिला अशा पद्धतीने नाचते की तिला जवळ उभ्या असलेल्या लोकांची पर्वा नाही.

डान्स करताना महिलेने काय केले हे पाहण्यासाठी तुम्हीही हा ट्रेंडिंग व्हिडिओ नक्की पाहा...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ही महिला नाचताना तिच्या आजूबाजूला काहीही पाहात नाही, त्यामुळे तिच्या डान्सच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टींना ती लांब ढकलते. एवढेच काय तर तिच्या जवळ उभ्या असलेल्या एका लहान मुलाला देखील ती अशी काही ढकलते की, तो मुलगा स्वत: थक्कं होतो.

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने सांगितले की, असे दिसते की तिने सात जन्मापासून डान्स केला नाही. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी हसणारे इमोजी पाठवले आहेत, काही लोकांनी तर आपल्या मित्रांना टॅगही केले आहे.