लग्नात काकूंचा हटके डान्स, स्टेप्स अशा की तरुणांनाही लाजवेल, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, ज्याची तुम्हाला एकदा का सवय लागली की, तुम्ही तेथे जाण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही.

Updated: Dec 25, 2021, 04:51 PM IST
लग्नात काकूंचा हटके डान्स, स्टेप्स अशा की तरुणांनाही लाजवेल, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, ज्याची तुम्हाला एकदा का सवय लागली की, तुम्ही तेथे जाण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. सोशल मीडीयावरती तुम्हाला तुमचे सगळे मित्र-मैत्रीण भेटतात. सोशल मीडियावर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकतो. एवढंच काय तर आपण काय करतो, कुठे जातो? या सगळ्याची माहिती आपण शब्द, फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करतो. येथे आपल्यला इतके मनोरंजक कंटेन्ट मिळतात की आपण स्वत:ला ते तासनतास पाहात राहण्यापासून रोखू शकत नाही.

सध्या लोकं आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडियावरती काही ना काही हटके अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक हटके व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंट 69fix वरुन अपलोड करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ एका लग्नातील किंवा पार्टीमधील असल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये सगळे लोकं डान्स करत आहेत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की, लग्न म्हणजे मज्जा आणि मस्ती, त्यामुळे सगळेच या क्षणांचा मनसोक्त आनंद घेतात.

हा व्हिडीओ देखील असाच काहीसा आहे. लग्नात आपण बऱ्याच लोकांना नागीन डान्स करताना पाहातो, तर काही जण जमिनीवर आडवे होऊन नाचू लागतात. परंतु असे व्हिडिओ आपण इंटरनेटवर बऱ्याचदा पाहिले आहे. परंतु आज जो आम्ही डान्सचा प्रकार तुम्हाला दाखवणार आहोत, तो काहीसा वेगळा आहे. ज्यामध्ये एका महिलेनं आपल्या डान्सने धुमाकुळ घातला आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काही लोक ग्रुपमध्ये डान्स करताना दिसत आहेत. मग अचानक बॉलिवूड स्टार हृतिक रोशनचे लोकप्रिय गाणं 'बँग बँग' वाजू लागते. हे ऐकून सर्वजण उड्या मारतात आणि नाचतात. मात्र या ग्रुपमध्ये उपस्थित काकूनां फारच जास्त आनंद होतो, ज्यामुळे त्या आपल्या शैलीत नाचू लागतात आणि आपल्या डान्स स्टेप्स दाखवून सर्वांना आश्चर्यचकित करतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या काकू जमिनीवर बसतात आणि जोरदार नाचू लागलात. लाल साडीत या काकूंनी असा काही डान्स, जे पाहून लोक थक्क झाले.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ 18 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे, तर लाखो वेळा पाहिला गेला आहे. इतर अनेक वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.